यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाचा बक्षिस समारंभ संपन्न

जनार्दन दांडगे
बुधवार, 10 जानेवारी 2018

लोणी काळभोर : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०१७-१८ अंतर्गत हवेली तालुका पातळीवर झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये मोठ्या गटामध्ये लोहगाव नं. १ शाळेच्या मुलांनी तर शिवापूर शाळेच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये कुंजीरवाडी येथील मार्गवस्ती शाळेच्या प्रांजल नवनाथ चौधरी हिने प्रथम तर मोठ्या गटामध्ये पेरणे शाळेच्या आदिती सुनील वाळके या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला. लोणी काळभोर (ता.

लोणी काळभोर : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०१७-१८ अंतर्गत हवेली तालुका पातळीवर झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये मोठ्या गटामध्ये लोहगाव नं. १ शाळेच्या मुलांनी तर शिवापूर शाळेच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये कुंजीरवाडी येथील मार्गवस्ती शाळेच्या प्रांजल नवनाथ चौधरी हिने प्रथम तर मोठ्या गटामध्ये पेरणे शाळेच्या आदिती सुनील वाळके या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे झालेल्या 'यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०१७-१८' तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन हवेली पंचायत समिती सभापती वैशाली महाडिक यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ९) झाले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वंदना काळभोर होत्या. यावेळी उपसभापती अजिंक्य घुले, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, अर्चना कामठे, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, कावेरी कुंजीर, हेमलता बडेकर, अनिल टिळेकर, रोहिणी राऊत, गटशिक्षणअधिकारी ज्योती परिहार, विस्तार अधिकारी ज्ञानदेव खोसे, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे प्राचार्य एस. एम. गवळी, केंद्रप्रमुख अशोक ससाणे, भरत इंदलकर उपस्थित होते. 

सायंकाळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यामध्ये सभापती महाडिक यांच्या सौजन्याने प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांसाठी सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांची जिल्हा पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे : 

वैयक्तिक स्पर्धा -
५० मीटर धावणे - 
लहान गट (मुले) - शंकर रमेश कांबळे (जे. पी. नगर), प्रेम दिपक चव्हाण (अष्टापूर), विशाल नानासाहेब डांगे (फुरसुंगी).

लहान गट (मुली) - ऋतुजा दादासो वाळके (पेरणे), शिवानी अरुण गाडे (प्रयागधाम), माधवी गोरखनाथ गायकवाड (मोगरवाडी). 

१०० मीटर धावणे -
मोठा गट (मुले) - कुणाल रविंद्र घोगरे (आर्वी), हनुमंत दत्तू देवरमणी (लोहगाव नं. १), आदित्य दयानंद साहू (लोणीकंद).

मोठा गट (मुली) - ऋतुजा भरत वाळके (पेरणे), प्रांजल प्रकाश मलाव (हिंगणगाव), ज्योती युवराज बेर्डे (वाडेबोल्हाई).

चेंडू फेक -
लहान गट मुले - दिपक प्रेम खडका (प्रयागधाम), रेहान सादिक पठाण (पेरणे), राहुल शिवपाल उईके (डोमखेल).

लहान गट मुली - शिवानी अरुण गाडे (प्रयागधाम), प्रणिता भानुदास कोळपे (कोळपेवाडी), दिशा दिलीप कुंजीर (तारमळा).

गोळा फेक - 
मोठा गट मुले - विश्वजित हनुमंत मांढरे (शिवापूर), प्रकश दिलबहद्दार नेपाळी (होळकरवाडी), प्रल्हाद सुभाष जाधव (प्रयागधाम),

मोठा गट मुली - रिती साहू (लोणी कंद), ज्योती युवराज बेर्डे (वाडेबोल्हाई), स्नेहा अरुण जाधव (शिवापूर).

जागेवर उंच उडी - 
लहान गट मुले - महेश प्रेमनाथ राठोड (पवारवस्ती), घनशाम नंदू शाह (उबाळेवस्ती), योगेश राजेश कांबळे (टिळेकरवस्ती).

लहान गट मुली - नेहा तानाजी गायकवाड (वाघोली नं. २), सृष्टी कैलास कदम (निरगुडे), आरती सुरेश जाधव (लोणी काळभोर).

धावती उंच उडी -
मोठा गट मुले - दिलीप रामचंद्र ओड (लोहगाव नं. १), प्रकश दिलबहद्दार नेपाळी (होळकरवाडी), सागर नेत्र बुढाथोकी (मांगडेवाडी).

मोठा गट मुली - निकिता रामभाऊ खंडागळे (होळकरवाडी), राणी मुकेश रेकवार (पेठ), ज्योती युवराज बेर्डे (वाडेबोल्हाई).

धावती लांब उडी -
मोठा गट मुले - स्वप्नील सिद्धार्थ जाधव (प्रयागधाम), तौसीफ ताहीर अन्सारी (लोणी काळभोर नं. ३), कुणाल रविंद्र घोगरे (आर्वी).

मोठा गट मुली - ऋतुजा दादासो वाळके (पेरणे), दिपाली खंडू लकडे (पेठ सोरतापवाडी), स्नेहा अरुण जाधव (शिवापूर).

वकृत्व स्पर्धा -
लहान गट - प्रांजल नवनाथ चौधरी (मार्गवस्ती), संस्कृती नवनाथ गावडे (खुटाळेवस्ती), आकांक्षा भानुसाद कोळपे (कोळपेवाडी).

मोठा गट - आदिती सुनील वाळके (पेरणे), प्रगती शिंदे व वैभवी कोल्हे (वाडेबोल्हाई व मांजरी खु.), सारिका संजय धारवडकर (गोऱ्हे).

गायन - 
मोठा गट मुले - हर्षित बाळासाहेब आदमाने (मांजरी बु.), मयूर संतोष दरेकर (लोणीकंद), ओम गजानन कानडे (वाघोली नं. १).

मोठा गट मुली - किर्ती ज्ञानेश्वर आव्हाळे (आव्हाळवाडी), अनिषा लक्ष्मण कांबळे (प्रयागधाम), दुर्वा पांडुरंग गाडेकर (लोणी कंद).

सांघिक स्पर्धा - 
कबड्डी - 
मोठा गट मुले - लोहगाव नं. १, केसनंद, शिवापूर.

मोठा गट मुली - शिवापूर, हिंगणगाव, वाडेबोल्हाई.

खो-खो - 
मोठा गट मुले - लोणीकंद, आर्वी, वडगाव शिंदे.

मोठा गट मुली - लोणीकंद, कल्याण, साडेसतरानळी.

लंगडी -
मोठा गट मुले - पेरणे, शेवाळवाडी.

मोठा गट मुली - पेरणे शेवाळवाडी.

लेझीम - 
लहान गट मुले - लोणीकंद, रायवाडी.

लहान गट मुली - वाघोली नं. २, अनाजीवस्ती, टिळेकरवस्ती.

मोठा गट मुले - खांदवेनगर, नऱ्हे, सिद्राममळा.

मोठा गट मुली - केसनंद, आंबेगाव, प्रयागधाम.

भजन - 
शाळा संघ - शिवापूर, खांदवेनगर, प्रयागधाम.

लोकनृत्य - 
शाळा संघ - शेवाळवाडी, वडगाव शिंदे, लोणीकंद.

Web Title: Marathi news pune news prize distribution