''सुंदर, हुबेहूब बाग पाहून जपानमध्येच असल्याचे वाटते''

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

धायरी : पु. ल. देशपांडे उद्यानात आल्यावर आम्हाला जपानमधील बागेत आल्यासारखेच वाटते. आपण आपल्या देशापासून दूर असल्याचे जाणवत नाही. इतकी सुंदर आणि हुबेहूब बाग तुम्ही तयार करून जतन केल्याबद्दल येथील नागरिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे गौरवोद्गार जपानमधील वाकायामा स्टेटचे प्रमुख सेईजो त्सुजी यांनी काढले. 

सिंहगड रस्ता येथील पु. ल. देशपांडे उद्यानाचा 12 वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक आणि जपानी पाहुण्यांच्या हस्ते केक कापून उद्यानाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला 

कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक, वाकायामा स्टेटचे प्रमुख सेईजो त्सुजी, शिंजी आराई, ताकाओ ईईझावा, योजी यामासकी, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, नगरसेविका अनिता कदम, समीर खळे, उद्यान विभागाचे संतोष कांबळे, सर्जेराव काळे आदी उपस्थित होते. 

देशपांडे उद्यान भारत-जपान मैत्रीचे प्रतीक आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या पुण्याला विशेष महत्त्व आहे. पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तूंचे जतन केले आहे. या वास्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन जपानने पुण्यातील पर्यटनास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन टिळक यांनी या वेळी केले. 

सेईजो त्सुजी म्हणाले की, नुकताच महाराष्ट्र राज्य आणि वाकायामा स्टेट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक आणि आर्थिक आदानप्रदान करार झाला आहे. पुण्यातील पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी जपान सरकारकडे आम्ही प्रयत्न करू. 

पुणे महापालिका, उद्यान विभाग, असोसिएशन्स ऑफ फ्रेंडस ऑफ जपान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: marathi news pune news pu la deshpande garden Japanese Garden