जल व्यवस्थापनातील यंत्रसामुग्रीचा कौशल्यपूर्ण वापर आवश्यक : कुरुवील्ला

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 14 जून 2017

"देशात जल व्यवस्थापनासाठी आवश्‍यक ती अद्ययावत यंत्रसामुग्री आपल्याकडे उपलब्ध केली जात आहे. मात्र त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठीचे कौशल्य विकसित करण्याची आवशकता आहे', असे प्रतिपादन प्रसारण मंत्रालय अंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष जॉर्ज कुरुवील्ला यांनी केले.

खडकवासला (पुणे) - "देशात जल व्यवस्थापनासाठी आवश्‍यक ती अद्ययावत यंत्रसामुग्री आपल्याकडे उपलब्ध केली जात आहे. मात्र त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठीचे कौशल्य विकसित करण्याची आवशकता आहे', असे प्रतिपादन प्रसारण मंत्रालय अंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष जॉर्ज कुरुवील्ला यांनी केले.

खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या 101व्या वर्धापन दिनानिमित्त "जलसंपत्ती व्यवस्थापनातील स्वयंचलित व उदयोन्मुख कौशल्यांची आवश्‍यकता" या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जॉर्ज कुरुवील्ला उपस्थित होते. कौशल्य परिषदेच्या आयएएससी विभागाचे अध्यक्ष नरेंद्र गोयल, जागतिक बॅंकेच्या जलसंपत्ती विभागाचे प्रतिनिधी अनिश बन्सल, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या मुख्य संचालक व्ही व्ही भोसेकर, सह संचालक राहुल जगताप, शास्त्रज्ञ एम के पवार, उपस्थित होते.

"संबधित क्षेत्रातील पात्र व्यक्तीमध्ये काम करण्याचे कौशल्य आहे का, नसल्यास त्याला प्रशिक्षण देऊन त्याला परिपूर्ण करण्याचे काम आम्ही करतो." असे गोयल यांनी सांगितले. "जलसंपत्ती विभागात वापरली जाणारी, यंत्रसामुग्री, त्या तयार करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तज्ञ, प्रत्यक्ष जलसंपत्ती विभागात काम करणारे अधिकारी यांना एकत्रित आणण्याचे काम आमच्या संस्थेने केले आहे. असे संस्थेच्या मुख्य संचालक भोसेकर यांनी सांगितले. यावेळी, बन्सल यांनी जल व्यवस्थापनात जग बाहेर वापरल्या जाणाऱ्या यंत्र सामुग्री आणि अनुभव यावेळी सांगितले.

Web Title: marathi news pune news pune breaking news kurivilla