दौंड - रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करावे : खा. सुळे

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 14 मार्च 2018

दौंड (पुणे) : दौंड येथील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्यासंबंधी नोटिसा अतिक्रमणधारकांना बजावल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. 

दौंड (पुणे) : दौंड येथील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्यासंबंधी नोटिसा अतिक्रमणधारकांना बजावल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. 

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका पत्राद्वारे आज (ता. १४) खासदार सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने दौंड येथील रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या झोपडपट्टी धारकांना ८ मार्च रोजी स्वखर्चाने सात दिवसांच्या आत अतिक्रमणे काढून टाकण्यासंबंधी नोटीसा दिल्या आहेत. रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करणारे नागरिक हे मागील २० ते २५ वर्षांपासून येथे राहत असून अचानकपणे त्यांना नोटिसा देऊन काढल्यास ते बेघर होतील. सदर नागरिक हे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मानवतेच्या दृष्टीने निवासाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी त्यांना अवधी देण्याची मागणी पत्रात नमूद करण्यात आली आहे.

दरम्यान रेल्वे झोपडपट्टी बचाव कृती समितीने आज (ता. १४)  झोपडपट्टीधारकांना पर्यायी जागा दिल्याशिवाय अतिक्रमण विरोधी कारवाई न करणे आणि झोपडपट्टीधारकांचे प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत पुनर्वसन करण्यासंबंधी मागणीचे निवेदन दौंड येथील रेल्वेचे वरिष्ठ अभियंता यांना सादर केले. रेल्वे प्रशासनाने पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्यास आंदोलन उभारण्याचा लेखी इशारा या निवेदनात नमूद करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे प्रमुख तथा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष नागसेन धेंडे यांनी दिली. सदर निवेदनावर राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्ष, भाजप, नागरिक हित संरक्षण मंडळ, रिपाईं (आठवले गट), बहुजन रयत परिषद, राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, बसप, सफाई मजदूर कॅंाग्रेस, आदी पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.

Web Title: Marathi news pune news railway slum area redevelopment supriya sule