भेदभावाच्या राजकारणात संवादाच्या राजकारणाचा आग्रह - रोहित पवार

संतोष आटोळे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

शिर्सुफळ (पुणे) : देशपातळीवर विकास हा चेष्टेचा विषय होत असताना जिल्हा परिषद, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातुन शिर्सुफळ गुणवडी जिल्हा परिषद गटात तसेच परिसरातील लोकांमध्ये ‘विकास’ या शब्दास तितकाच विश्वास मिळवून दिला. द्वेषाच्या, भेदभावाच्या राजकारणात संवादाच्या राजकारणाचा आग्रह धरीत विकासाला प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले.

शिर्सुफळ (ता.बारामती) येथे खासदार शरद पवार यांच्या फंडातुन वाणीमळा येथे 17 लाख 17 हजार रुपये व बोत्राई मळा येथे 12 लाख 23 हजार रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधारा कामाच्या शुभारंभा प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब आटोळे, सरपंच अतुल हिवरकर, ग्रामपंचायत सदस्य विश्वास आटोळे, हनुमंत मेरगळ, दादासाहेब आटोळे, अण्णासाहेब आटोळे, बाळासाहेब म्हेत्रे, संतोष आटोळे, सुखदेव हिवरकर, महादेव आटोळे, योगेश बनकर, कांतीलाल मेरगळ, रामभाऊ आटोळे, छोटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नामदेव ढवळे, ग्रामसेवक दत्तात्रय धावडे, ठेकेदार दत्तात्रय वाबळे यांच्यासह संबंधित भागातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले, जिल्हा परिषद गटामध्ये खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद, तसेच विविध खाजगी कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे प्राधान्याने सुरु आहेत. यामुळे जलसंधारण, रस्ते, पाणी यांसह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. तसेच उर्वरित प्रश्नही सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना आप्पासाहेब आटोळे यांनी शिर्सुफळ येथील सिमेंट बंधारा कामासाठी स्वतः रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन शरद पवार यांच्या खासदार निधीतून निधी मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Web Title: Marathi news pune news rohit pawar development