रंजक गोष्टी ऐकण्यासाठी सज्ज व्हा आजपासून!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पुणे : मुलांना नेमून दिलेल्या अभ्यासापलीकडे नेणारा दोन दिवसांचा 'सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल' शनिवारी (ता. 3) सुरू होत आहे. 
'सकाळ वायआरआय' व 'यंग बझ क्‍लब'ने आयोजित केलेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आठ स्टोरी टेलर्सकडून प्रत्यक्ष गोष्टी ऐकण्याबरोबर वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये भाग घेण्याची अनोखी संधी आहे.

पुणे : मुलांना नेमून दिलेल्या अभ्यासापलीकडे नेणारा दोन दिवसांचा 'सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल' शनिवारी (ता. 3) सुरू होत आहे. 
'सकाळ वायआरआय' व 'यंग बझ क्‍लब'ने आयोजित केलेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आठ स्टोरी टेलर्सकडून प्रत्यक्ष गोष्टी ऐकण्याबरोबर वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये भाग घेण्याची अनोखी संधी आहे.

शॅडो व अन्य पपेट, कॉस्च्युम, पेपर स्टोरीज अशा विविध प्रकारांनी फेस्टिव्हलमध्ये कथा सादर होतील. प्ले ग्रुप ते सीनियर केजीतील विद्यार्थ्यांना जुमायनी आरिफ (मलेशिया) आणि मेबल ली (सिंगापूर), पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना हेलन नमाय आणि जॉन म्युकेनी नमाय (केनिया), चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्युंग आ किम (साउथ कोरिया), जीवा रघुनाथ (भारत) आणि आठवी व त्यापुढील विद्यार्थ्यांना लिलियन पॅंग (ऑस्ट्रेलिया), मारियान ख्रिस्तीनसन (डेन्मार्क) हे स्टोरी टेलर्स गोष्टी सांगणार आहेत.

गोष्टींच्या एका सत्रासाठी प्रवेश मूल्य रु. 250 आहे. महोत्सवाच्या दोन्ही दिवशी सायंकाळी फिनिक्‍स मार्केट सिटी लिबर्टी स्क्वेअरमध्ये आठही स्टोरी टेलर्स 'ग्रॅंड शोकेस' हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी 4.30 ते 6 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी रु. 250 शुल्क आहे. मात्र महोत्सवासाठी शुल्क भरून नोंदणी करणाऱ्या पहिल्या 500 जणांना 'ग्रॅंड शोकेस'ची एक प्रवेशिका भेट मिळेल.

महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शाळा, कॉर्पोरेट व महाविद्यालयांना समूह नोंदणीदेखील करता येणार आहे. रविवार, ता. 4 फेब्रुवारीची नोंदणी चालू आहे. 'ग्रॅंड शोकेस'च्या प्रवेशिका फिनिक्‍स मॉलमध्ये ईस्ट कोर्टला उपलब्ध असतील. सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलतर्फे टॅटू पेंटिंग व आकर्षक सेल्फी बूथची व्यवस्था केली आहे, तसेच लिटल मिलेनियम स्कूलतर्फे सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हलमध्ये 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

काय : इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल 2018 
कधी : 3 फेब्रुवारी (शनिवार), 4 फेब्रुवारी (रविवार) 
केव्हा : बॅच 1 : दुपारी 12 ते 1.30; बॅच 2 : दुपारी 2.30 ते 4 

कुठे : फिनिक्‍स मार्केट सिटी, विमाननगर, पुणे 
मर्यादित जागा : (ता. 3 व 4 फेब्रुवारी) नोंदणी सुरू 
संपर्क : 8805009395 किंवा 8605846838 

Web Title: marathi news pune news Sakal International Story telling festival

टॅग्स