'सकाळ'च्या रामदास जगतापांना राज्यशासनाचा पुरस्कार

संतोष शेंडकर
बुधवार, 17 जानेवारी 2018

सोमेश्वरनगर : दैनिक सकाळचे बारामती तालुक्यातील सांगवी येथील बातमीदार रामदास सदाशिव जगताप यांना राज्यशासनाच्या 'राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान' अंतर्गत 'राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार- 2018' हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबई येथे आज समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

सोमेश्वरनगर : दैनिक सकाळचे बारामती तालुक्यातील सांगवी येथील बातमीदार रामदास सदाशिव जगताप यांना राज्यशासनाच्या 'राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान' अंतर्गत 'राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार- 2018' हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबई येथे आज समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

दारिद्र्यरेषेखालील बचत गटांना प्रोत्साहीत करण्यासाठी 2006 पासून राज्यशासनाने राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजना सुरू केली होती. या अनुषंगाने राज्य, विभाग या स्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यातून एका पत्रकारास हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी सन 2016-17 या वर्षात गटविकास अधिकाऱ्यांमार्फत राज्यशासनाने सर्वेक्षण केले होते. यानुसार प्राप्त झालेल्या अहवालातून पुणे जिल्ह्यासाठीच्या पुरस्कारासाठी रामदास जगताप यांची निवड करण्यात आली होती. जगताप यांनी दैनिक सकाळच्या माध्यमातून जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील स्वयं सहाय्यता बचत गटांना सहाय्यभूत आणि पोषक अशी प्रसिध्दी दिली होती. बचत गटांच्या आर्थिक, सामाजिक, बौध्दिक व आरोग्य विषयक समस्यांवर प्रकाश टाकला होता. पंचायत समितीच्या विविध विधायक योजनांना सकाळमधून प्रसिध्दी दिली होती. तसेच वैयक्तीक पातळीवरही पथनाट्यांच्या माध्यमातूनही बचत गटांबाबत जागृती केली होती. यामुळे जगताप यांना आज बांद्रा (मुंबई) येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार तृप्ती सावंत, आयएएस अधिकारी आर. विमला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भाषणे झाली. याप्रसंगी खादी ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्य़कारी अधिकारी बिपीन जगताप, किशोर बगाडे, महादेव कारंडे आदी उपस्थित होते. बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे, गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी जगताप यांचे अभिनंदन केले. यापूर्वी जगताप यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा व्यसनमुक्तीबाबत राज्यभर जागृती केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाला होता. 

 

Web Title: Marathi news pune news sakal reporter ramdas jagtap awarded by state government award