मुक्त, सर्जनशील निर्मितीचे रंगभूमी हे माध्यम - बंडोपाध्याय 

मुक्त, सर्जनशील निर्मितीचे रंगभूमी हे माध्यम - बंडोपाध्याय 

पुणे  - ""दिल्लीत "थिएटर ऑलिंपिक' हा उपक्रम सुरू झाला आहे. या स्पर्धेत कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. स्पर्धेत जिंकण्यासाठी दुसऱ्याला अयोग्य मार्गाने हरविण्यास स्पर्धक मागेपुढे पाहत नाही. पण रंगभूमी ही मुक्त आणि सर्जनशील निर्मितीचे माध्यम आहे. अशा स्पर्धेच्या अट्टहासापायी श्‍वास गुदमरला जाण्याची भीती आहे,'' अशी भावना नाट्यकर्मी समीक बंडोपाध्याय यांनी व्यक्त केली. 

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सपन सरन, इश्‍पिता चक्रबोर्ती, निरंजन पेडणेकर, बिक्रम घोष आणि युगंधर देशपांडे या पाच प्रतिभावान कलाकारांना तेंडुलकर-दुबे स्मृती पुरस्कार नाट्यकर्मी बंडोपाध्याय यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. रविवारी घरकुल लॉन्स येथे झालेल्या या समारंभाला प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त अशोक कुलकर्णी, नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग, किरण यज्ञोपवित व नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

""गतवर्षीपासून प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर आणि दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. या दोघांनाही प्रतिष्ठानबद्दल आस्था होती. युवा रंगकर्मींना विनाअट शिष्यवृत्ती देणे, ही कल्पना तेंडुलकरांची होती. केवळ कल्पना देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यासाठी आवश्‍यक निधी जमा करण्यास हातभारही लावला. त्यामुळे या दोघांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार समर्पक व यथायोग्य ठरतो,'' असे मत अशोक कुलकर्णी यांनी मांडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com