पुणे - सांगवीत महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

रमेश मोरे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : जागतिक महिला दिनानिमित्त सांगवी येथील बालाजी महिला प्रतिष्ठाणच्या वतीने शनिवार दिनांक १० मार्च रोजी महिलांसाठी "मोफत व्यावसायिक मार्गदर्शन विषयक महिला मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे. 

मार्गदर्शिका स्मिता ढोरे, जयश्री खिलारे व टेल्को कंपनीच्या वतीने महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात येणार असुन याचबरोबर दिपक जगताप यांचे फायरसेफ्टी विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर महिला मर्दानी खेळांचे सादरीकरण व शालिनी ग्रुपतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे  नगरसेवक हर्षल ढोरे व बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता बालाजी लॉन्स, ढोरे नगर येथे होणाऱ्या कार्यक्रमास प्रतिभा महिला प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा अश्विनीताई लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेविका माई ढोरे, माजी स्थायी अध्यक्षा सिमाताई सावळे, शारदा सोनवणे, नगरसेवक संतोष कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Marathi news pune news sangavi guidance to women