संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबीर

रमेश मोरे
शनिवार, 3 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा सांगवीच्या वतीने "अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा सांगवी" पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिरादरम्यान २६९ युनिट रक्त "यशवंतराव चव्हाण रक्तपेढी" पिंपरी, संत निरंकारी रक्तपेढी (मुंबई) यांनी संकलित केले. शिबिराचे उद्घाटन मा. ताराचंद करमचंदानी (झोनल इंचार्ज, पुणे झोन) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा सांगवीच्या वतीने "अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा सांगवी" पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिरादरम्यान २६९ युनिट रक्त "यशवंतराव चव्हाण रक्तपेढी" पिंपरी, संत निरंकारी रक्तपेढी (मुंबई) यांनी संकलित केले. शिबिराचे उद्घाटन मा. ताराचंद करमचंदानी (झोनल इंचार्ज, पुणे झोन) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तर शिबिरासाठी संत निरंकारी मंडळाचे आ.गिरधारीलाल मतनानी (सेक्टर संयोजक - पिंपरी), प्रल्हाद गौड (सेवादल संचालक), दत्तात्रय शेळके, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे माई ढोरे  शारदाताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला रक्तदान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली, यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक, सेवादल,साधं-सांगत उपस्थित होते. सांगवी परिसरातील गजानन महाराज मंदिर, शितोळे नगर, प्रियदर्शनी नगर, वसंतदादा पुतळा या विविध ठिकाणी जाऊन रक्तदान शिबिराबद्दल जनजागृती करण्यात आली. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने ठिक-ठिकाणी अशा प्रकारचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आत्तापर्यंत अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांमधून ९.५ लाखांपेक्षा जास्त युनिट रक्तदान संकलित झाल्याचे दत्तात्रय शेळके यांनी सांगितले. मागील वर्षी पुणे झोन परिसरात राबविण्यात आलेल्या शिबिरांमधुन मध्ये एकूण ४० ठिकाणी  रक्तदान शिबिरामध्ये ४५०० युनिट पेक्षा जास्त रक्त संकलित करण्यात आले होते.

Web Title: Marathi news pune news sant nirankari foundation blood donation camp