मांजरी बुद्रुक येथे पदग्रहण सोहळा थाटात

कृष्णकांत कोबल
बुधवार, 21 मार्च 2018

मांजरी - मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडला. प्रामाणिकपणे व निःस्वार्थीपणे ग्रामस्थांची सेवा करण्याची शपथ घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून पदाधिकारी व सदस्यांनी पदभार घेतला.

मांजरी - मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडला. प्रामाणिकपणे व निःस्वार्थीपणे ग्रामस्थांची सेवा करण्याची शपथ घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून पदाधिकारी व सदस्यांनी पदभार घेतला.

मांजराईदेवी रयत परिवर्तन पँनेलचे प्रमुख गोपाळ म्हस्के, राजीव घुले पाटील, नंदकुमार घुले, माऊली घुले, बबनराव घुले पाटील, जगन्नाथ घावटे, बाळासाहेब घुले, दिगंबर घुले, जयसिंग म्हस्के, महेश बेल्हेकर, भानुदास म्हस्के, अक्षय घुले, राहुल घुले, जयराज घुले, शैलेश बेल्हेकर, अँड.शैलेश म्हस्के, आदित्य घुले पाटील, शिवाजी घुले, विशाल म्हस्के, अनिल घुले, अंकुश भोसले आदींसह महिला,ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा सरपंच प्रथमच थेट जनतेतून निवडून देण्यात आला. मांजराईदेवी रयत परिवर्तन पँनेलचे शिवराज घुले हे ४४७ मतांनी विजयी झाल्याने यांना सरपंचपदाचा मान मिळाला आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शिवराज बबनराव घुले यांचे अध्यक्षतेखाली नविन उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून नायब तहसीलदार समीर यादव, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी काम पाहिले. अमित ज्ञानेश्वर घुले यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी  बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले.  

दरम्यान, ग्रामपंचायत पटांगणात पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवनियुक्त सरपंच शिवराज घुले आणि उपसरपंच अमित घुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदग्रहणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. यावेळी सदस्य पुरुषोत्तम अण्णा धारवाडकर, संजय धारवाडकर, सुनीता घुले, निर्मला म्हस्के, सुमित घुले, सुवर्णा कामठे, सीमा घुले, समीर घुले, उज्वला टिळेकर, नयना बहिरट, प्रमोद कोद्रे, जयश्री खलसे, नेहा बत्ताले, बालाजी अंकुशराव, आशा आदमाने, निलेश घुले उपस्थित होते.

सरपंच शिवराज घुले म्हणाले,
"नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी घरबसल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे मांडता याव्यात यासाठी लवकरच हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देत ग्रामपंचायत टेक्नोसॅव्ही करण्याचा संकल्प आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, पथदिवे, आरोग्य, रस्ते यांसारख्या नागरी सुविधांबाबत  आपण नेहमीच जागरूक राहू. सर्व सहकारयांच्या मदतीने अहोरात्र काम  करून एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण करू.''

गोपाळ म्हस्के म्हणाले,
"ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पँनेलवर जनतेने जो विश्वास दाखवून सरपंच आणि सदस्य निवडून दिले आहेत त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जावू दिला जाणार नाही. सरपंच, उपसरपंच आणि सर्वच सदस्य पारदर्शी कारभार करून गावाचा विकास साधतील.'' 

Web Title: marathi news pune news sarpancha oath taking ceremony