मराठी शाळांनी गुणवत्तेवर भर दिल्यास पटसंख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही-गंगाधर म्हमाणे

दत्ता म्हसकर
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : मराठी माध्यमाच्या शाळांनी गुणवत्तेवर भर दिल्यास पटसंख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. असे मत राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी येथे व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव देणारे उपक्रम मराठी माध्यमाच्या शाळांनी राबविल्यास मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल निश्चितच वाढेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे विद्यालयाचे मुख्याध्यापक केरभाऊ ढोमसे यांच्या सेवापूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब खिलारी होते. 

यावेळी म्हमाणे म्हणाले, सध्या स्पर्धेच्या युगात पालक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी आग्रही आहेत. विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या शिक्षण व्यवस्थेकडून मोठ्या अपेक्षा असून मराठी शाळांनी या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.              

यावेळी आमदार शरद सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके, अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, सुरेश थोरवे, कार्याध्यक्ष जी के थोरात, नगराध्यक्ष शाम पांडे, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत केरभाऊ ढोमसे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी केरभाऊ ढोमसे यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन संस्था व विविध शिक्षक संघटनेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिननाथ पानसरे यांनी केले. संदीप दातार व पंकज घोलप यांनी मानपत्र वाचन केले.विलास चव्हाण यांनी स्वागत केले. रोहिदास भागवत यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi news pune news school activities retirement