डॅफोडिल्स इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शन

राजकुमार थोरात
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर : आनंदनगर (ता.इंदापूर) येथील डॅफोडिल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ९३ प्रकल्प सादर केले.

वालचंदनगर : आनंदनगर (ता.इंदापूर) येथील डॅफोडिल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ९३ प्रकल्प सादर केले.

इंदापूर तालुक्याचे सभापती करणसिंह घोलप व जंक्शन सरपंच राजकुमार भोसले यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दीपक शिंदे,संजय शिंदे, रवींद्र ताबे, उमेश शिंदे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सौरउर्जावरची उपकरणे, वृक्षसंवर्धन काळाची गरज, पाणी आडवा पाणी जिरवा, मत्स्यपालन, अंतराळामधील ग्रह व ताऱ्यांची माहिती सांगणारी आकाशगंगा, सूर्यमालेचे चालणारे काम, हवेच्या दाबावरती चालणारी उपकरणे, वीजचोरी रोखण्याचा प्रकल्प तसेच टाकावू वस्तु पासुन टिकावू वस्तु तयार करण्यात आलेले प्रकल्प सादर करण्यात आले. शाळेतील मुलांना काढलेली चित्रे व हस्तकलेच्या वस्तु प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली होती. कार्य्रकमाचे नियोजन साईप्रसाद शिक्षण संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष तेजस्विनी राणे,सचिव रुपाली शिंदे व प्राचार्य प्रसन्ना कुलकर्णी यांनी केले. 

Web Title: Marathi news pune news science exhibition in school