समाजाने जेष्ठांचा योग्य सन्मान राखवा - रमेशराव जाधव 

Bhigwan
Bhigwan

भिगवण (पुणे) : जेष्ठ नागरिक म्हणजे अडगळीतील वस्तु नव्हे तर अनुभवांची प्रचंड मोठी शिदोरी आहे. तरुणांचा उत्साह व जेष्ठांचा अनुभव यांचा योग्य समन्वय राखल्यास कोणत्याही कुटुंबाची व पर्यायाने समाजाची प्रगती होते. भारतीय संस्कृतीमध्ये जेष्ठांना मोठा मान आहे तरुण पिढीनेही जेष्ठांचा योग्य सन्मान व आदर राखला पाहिजे असे मत पंचायत समितीचे माजी सभापती रमेशराव जाधव यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कला महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जेष्ठ नागरिक कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य केशवराव जगताप, इंदापुर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गुजर, प्रा. तुळशीराम सातपुते, प्रमुख वक्ते विश्वास पटवर्धन, विजया दाते, जेष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी संपतराव घाडगे, प्राचार्य भास्कर गटकुळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. संदीप साठे उपस्थित होते. 

जाधव पुढे म्हणाले, येथील भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष बांधण्यात आला आहे. भिगवण येथे जेष्ठ नागरिक संघाची स्थापना करुन जेष्ठांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न राहील.

जेष्ठ नागरिक आणि समाज या विषयावर बोलताना दत्तात्रय गुजर म्हणाले, मावळता सूर्य पाहण्यास लोकांना आवडते परंतु मावळतीकडे झुकलेल्या जेष्ठांचा मात्र कुटुंबामध्ये अवमान होतो ही दुर्दैवाची बाब आहे. भारतीय संस्कृतीमधील एकत्र कुटुंब पध्दती अभिमानाची बाब आहे परंतु अलीकडे या संस्कृतीचा तरुणांना विसर पडला असून वाढते वृध्दाश्रम ही भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने शरमेची बाब आहे. जेष्ठांना एकत्र येण्यासाठी जेष्ठ नागरिक संघ महत्त्वपूर्ण भुमिका बजावत असुन गावोगावी असे संघ स्थापन होण्याची आवश्यकता आहे.

जेष्ठांचे आरोग्य या विषयावर बोलताना विजया दाते म्हणाल्या, जेष्ठांनी वाढत्या वयांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वयोमानानुसार योग्य प्रकारच्या तपासण्या करुन घेणे. जेष्ठांनी शरीर व मन दोन्ही स्वच्छ ठेवून निकोप जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  

कार्यशाळेमध्ये विश्वास पटवर्धन यांनी स्वभाव राशीचे हा कार्यक्रम सादर करुन जेष्ठांची करमणुक केली व उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रा. तुळशीराम सातपुते, संपतराव घाडगे, प्राचार्य भास्कर गटकुळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. संदीप साठे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. नवनाथ सावंत यांनी केले. तर आभार प्रा. शाम सातर्ले यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com