स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीवर दत्तकला शिक्षण संस्थेत व्याख्यान

प्रशांत चवरे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

भिगवण : ग्रामीण भागातील व तरुणांना स्पर्धा परिक्षेच्या तयारीविषयी योग्य मार्गदर्शन व्हावे या हेतुने सकाळ विद्या व शिवनेरी फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला औषध निर्माण महाविद्यालयांमध्ये गुरुवारी (ता. 1) सकाळी 11.00 वा. शिवनेरी फाऊंडेशनचे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. सुहास कोकाटे यांचे तयारी स्पर्धा परिक्षांची या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ, भिगवण येथील कला महाविदयालयाचे प्राचार्य भास्कर गटकुळ, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, दत्तकला औषधनिर्माण महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. उर्मिलेश झा आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रा. सुहास कोकाटे हे राज्यसेवा परिक्षा, पी.एस.आय. एस.टी.आय. ए.एस.ओ परिक्षा, खात्याअंतर्गत फौजदार परिक्षा, टॅक्स असिस्टंट, औषधनिर्माण अभ्यासक्रमांमधील विविध परिक्षा आदी परिक्षाविषयी मार्गदर्शन करणार आहे. स्पर्धा परिक्षांची पूर्व तयारी, अभ्यासाचे स्मार्ट नियोजन, अभ्यासाठी आवश्यक स्टडी मटेरीयल या विषयावर प्रा. सुहास कोकाटे आदीविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास स्पर्धा परिक्षांची तयारी करत असलेले विदयार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित रहावे. 

Web Title: Marathi news pune news shivaneri foundation lecture