युवक प्रतिष्ठान व पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे श्रृती श्रीखंडेचा सत्कार

संदिप जगदाळे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

हडपसर : केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC) च्या "कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस" या परिक्षेत मुलींमध्ये देशात सर्वप्रथम आल्याबद्दल श्रुती विनोद श्रीखंडे यांचा सत्कार युवक प्रतिष्ठान व पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत सुरसे याच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी बोलताना प्रशांत सुरसे म्हणाले, पुणे शहर शिक्षणाचे माहेर घर असुन क्रांतीज्योती थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि याच पुण्यातील श्रुती श्रीखंडे यानी युपीएसीमध्ये देशात प्रथम येऊन पुणे शहराच्या लौकिकात भर टाकली. यामुळे श्रुती व तिच्या कुटुंबियांचा अभिमान वाटतो. याप्रसंगी श्रृतीचे वडील वडिल ब्रिगेडीयर विनोद श्रीखंडे व त्यांच्या आईचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रशांत सुरसे, नंदकुमार अजोतिकर, ओमप्रकाश झंवर, पल्लवी सुरसे, हरिष शेलार, सचिन नेमकर, निलेश गौड व युवक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Web Title: Marathi news pune news shruti shrikhande