समाज जागृतीसाठी धार्मिक कार्यक्रमांची गरज - कुऱ्हेकर

रमेश मोरे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : सध्याच्या विज्ञानयुगातील तरूणाई भरकटत चालली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपल्यातले चांगलेपण आपण विसरत चाललो आहे. विज्ञानाला आध्यात्माची जोड देऊन समाज जागृतीसाठी धार्मिक कार्यक्रमांची गरज आहे. असे किर्तनकार ह.भ.प.मारूती बाबा कुऱहेकर यांनी बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित श्री दत्त आश्रम जुनी सांगवी येथील अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या किर्तन सेवेत बोलताना व्यक्त केले.

यात सकाळच्या सत्रात वीणा, टाळ मृदंग पूजन सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांच्याहस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात महिला भजनी मंडळांचा  भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी हरिपाठ व रात्री ठिक सात वाजता श्री ह भ प कैलास महाराज खंडागळे आळंदी यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. त्यांनी सेवेसाठी श्री जगद्गुरू तुकोबाराय यांची आरती या अभंगाची निवड केली होती. ते म्हणाले, तुकोबारायांची आरती म्हणजेच तुकोबारायांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांना गायनसाथ  श्री ह भ प नागेश महाराज पवार, विशाल  पांढरे तर मृदंग साथ श्रीकांत महाराज आवचार व जांबुवंत महाराज तुळजापूरकर यांनी केली यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित संत-महंत मंडळी परमहंस परंपरेतील कमंडलानंद मौनी स्वामी श्री ह भ प शंकर महाराज हे उपस्थित होते .कार्यक्रमासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यासपिठाचे सुत्रसंचलन श्री तुकाराम भाऊ महाराज यांनी केले.

Web Title: Marathi news pune news social development cultural programs