लोणी काळभोरमध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजना उपक्रम

जनार्दन दांडगे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

लोणी काळभोर : शासनाला कर स्वरुपात मिळणाऱ्या निधीचा वापर समाजाच्या हितासाठी व्हावा, या हेतूने आयोजित लाभार्थी शोध मोहीम शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे केले. कदमवाकवस्ती येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. 30) सामाजिक अर्थसहाय्य योजना कार्यक्रमानिमित थेऊर मंडलस्तरावर आयोजित संजय गांधी निराधार योजना लाभार्थी शिबिरात मार्गदर्शन करताना कामठे बोलत होत्या. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे हवेली तालुकाध्यक्ष रामदास हरगुडे होते. या कार्यक्रमाचे संयोजन कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजना तहसिलदार सुनिता आसवले, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, युगंधर काळभोर, सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाळसाहेब कदम, मंडलाधिकारी हरिदास चाटे, गावकामगार तलाठी विष्णू चिकणे, अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी पी. एस. देसाई उपस्थित होते. 

यावेळी अर्चना कामठे म्हणाल्या, "शासनाने सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरु केल्या आहेत. मात्र योजनाच्या अपुऱ्या माहितीमुळे अनेक लाभार्थी अशा योजनांपासून वंचित राहतात. आगामी काळात शासनाच्या सर्व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळावा या हेतूने लाभार्थी शोध मोहीम शिबिरे घेण्याचा आमचा मानस आहे." यावेळी गौरी गायकवाड म्हणाल्या, "ग्रामस्थांच्या मागणीनुसार संजय गांधी निराधार योजना लाभार्थी शोध मोहीम शिबीर घेण्यात आले आहे. यापुढील काळात विविध शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा." कार्याक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रदिप काळभोर यांनी केले तर आभार चित्तरंजन गायकवाड यांनी मानले.  

Web Title: Marathi news pune news social financial scheme