सामाजिक न्याय विभागाकडून जिल्हास्तरीय दिव्यांग स्पर्धेचे आयोजन

संदिप जगदाळे
मंगळवार, 13 मार्च 2018

हडपसर (पुणे) : अपंगत्वामुळे निराश न होता परिस्थितीशी जुळवून जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवत दिव्यांग मुले विविध मैदानी स्पर्धेत सहभागी होतात, त्यामुळे त्यांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. सामाजिक न्याय विभाग दिव्यांग मुलांच्या स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन देते. जिल्ह्यातील दिव्यांग मुलांनी राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. या खेळाडूंचा आम्हाला अभिमान आहे, असे मत सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त पी. एस. कवठे यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील अपंग शाखेच्यावतीने आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रंसगी कवठे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, वैद्यकीय सामाजिक कार्य़कर्त्या मंजीरी देशपांडे, कार्यक्रमाचे प्रायोजक व उद्योजक अतुल उजवणे, दशरथ जाधव, नगरसेवक योगेश ससाणे उपस्थित होते.

ससाणे म्हणाले, नैसर्गिक किंवा कृत्रिम कारणाने शरीराचा एखादा अवयव निकामी होतो. अशाप्रसंगी माणूस खचला जातो. नैराश्य येते, पण न डगमगता आहे त्या परिस्थितीला जुळवून त्यावर मात करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. अपंगांना सहानभुती नव्हे तर सन्मान मिळवून देण्यासाठी समाजाने प्रयत्न करायला हवा. धडधाकट माणसे शुल्लक कारणावरून हताश होतात. मात्र दिव्यांग व्यक्तींचे जीवनच संघर्षमय़ असताना देखील ते आनंदाने त्याला सामोरे जातात. हा गुण त्यांच्याकडून सर्वांनी शिकण्यासारखा आहे. 

उजवणे म्हणाले, जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते. हे स्पर्धेत सहभागी झालेल्या विदयार्थ्यांना पाहिल्यानंतर जाणवले. यावर्षी स्पर्धेची तयारी करायला वेळ कमी मिळाला. पुढील वर्षी या स्पर्धेपेक्षा अधिक चांगली व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सामाजिक न्याय विभागाने मला प्रायोजक म्हणून संधी दिली याबाबत मी या विभागाचा आभारी आहे.

मंगळवारी अॅथलेक्टीक्स स्पर्धेचे उद्घाटन झाले. यामध्ये जिल्हयातील 16 मुकबधिर व 3 अस्थीव्यंग विशेष शाळांनी सहभाग घेतला. तर आज मतिमंद प्रवर्गातील 17 तर अंध प्रवर्गातील 4 शाळा सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 1500 स्पर्धकांना सहभाग घेतला आहे. 

Web Title: Marathi news pune news Social Justice Department handicap students competition