हडपसर करंडक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

कृष्णकांत कोबल
शनिवार, 20 जानेवारी 2018

मांजरी : हडपसर येथील सुवर्ण स्पोर्टस् क्लबने ''हडपसर चषक 2018'' रात्र कब्बडी स्पर्धांचे आयोजन केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते झाले.

खुल्या गटातील महिला व पुरूषांसाठी ही स्पर्धा आयोजित केली असून शहर व जिल्हा परिसरातून 52 संघ सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पुरूषांचे 32 तर महिलांचे 20 संघ आहेत. 

शहर प्रमुख बाबर म्हणाले,''बाळासाहेब ठाकरे यांचा खेळ व तरूणांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय सकारात्मक होता. त्यांच्या जयंती निमित्त उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी खास महाराष्ट्रीय असलेल्या कब्बडी स्पर्धांचे आयोजन करून साहेबांना खऱ्या आदरांजली वाहिली आहे. आपल्या राज्यापेक्षाही लहान लहान देश आॅलिंपिक सारख्या स्पर्धेत शेकडोने पदके मिळवित आहेत. सर्वाधीक तरूण म्हणून उदयास येत असलेल्या आपल्या देशातील खेळाडूंना संधी आणि प्रोत्साहन देण्याचे काम अशा स्पर्धांमधून झाले पाहिजे. सरकार त्याबाबत कमी पडत असल्याची खंत आहे. खेळाडूंना सरकारने पहिल्यापासूनच चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यातूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव झळकविण्याची चांगली संधी मिळू शकते.''  

संयोजक समीर तुपे म्हणाले,''सुवर्ण स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून वेळोवेळी विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. जिल्हा कबड्डी असोसिएशनने मान्यता दिल्यामुळे ही स्पर्धा घेण्याचे ठरविले. त्याला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना एकूण सुमारे अडीच लाख रूपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.''  

माजी उपमहापौर सुनील गायकवाड, नगरसेवक मारुती तुपे, प्रमोद भानगिरे, बाजार समितीचे उप सभापती भूषण तुपे, माजी नगरसेवक विजय देशमुख, तानाजी लोणकर, जनसेवा बँकेचे संचालक रवी तुपे, राम खोमणे, विनोद धुमाळ, सतीश जगताप, संजय शिंदे, सुनील दाभाडे, उल्हास तुपे, माऊली तुपे, अॅड. के. टी. आरू, सागर जगताप, सचिन तुपे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

संयोजक समीर तुपे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. निलेश बढे यांनी सूत्रसंचालन तर सचिन तुपे यांनी आभार मानले.

Web Title: marathi news Pune News sports news Kabaddi