वालचंदनगरजवळ एसटीचा स्टेअरींग रॉड तुटून बस शेतात 

राजकुमार थोरात
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे आज सकाळी बारामती-इंदापूर राज्यमार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या अचानक स्टेअरींग रॉड तुटल्याची घटना घडली. बसमध्ये 32 प्रवासी होते. यातील आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांनी, वेळ आली होती...पण काळ आला नसल्याचा अनुभव घेतला.

आज सकाळी इंदापूर आगाराची  एम.एच. 42 ई एफ 6613 ही बस बसचालक हरीदास गिते बारामतीहून जंक्शनामार्गे इंदापूरकडे निघाले होते. अंथुर्णे गावच्या हद्दीमध्ये दळवीवस्‍ती येथे पावणे अकराच्या वाजण्याच्या सुमारास अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालकाने बसमधील 32 प्रवाशांना सावध केले. स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले होते. बसची चाके वळतील तिकडे बस चालली होती. चालकाच्या विरुद्ध बाजूने बस भरधाव वेगाने जात असताना रसत्यालगतच्या बाभळीच्या झाडाला धडकण्याच्या बेतात असताना अचानक बसची दिशा बदलली. रस्त्यालगतच्या मोठ्या खड्ड्यामध्ये आदळून जवळच्या मक्याच्या शेतामध्ये बस जाऊन थांबली. 

खड्यामध्ये बस आदळल्याने बसमधील आठ ते दहा प्रवाशी किरकोळी जखमी झाले आहेत. बस थांबलेल्या ठिकाणापासून दहा ते वीस फुटाच्या अंतरावर एका शेतकऱ्यांचे घर व दुकान होते. आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींना अंथुर्णे येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार करुन सोडून देण्यात आले. या घटनेची वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली नव्हती. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी बसमधील घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला.

Web Title: Marathi news pune news st bus staring road farm