१५व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला सुरुवात 

मिलिंद संधान
बुधवार, 17 जानेवारी 2018

नवी सांगवी (पुणे) : १५व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला पिंपळे गुरव येथे सुरुवात झाली असून पुणे, सोलापूर, सातारा, तळेगाव, फलटण येथून ४२ नाटकांसह हजारो कलाकार यात सहभागी झाले आहेत. नटसम्राट निळुफुले नाट्यगृहात बालकलाकार श्रृती निगडे हिच्या हस्ते नुकतेच या स्पर्धेचे उद्घाटन लेखक प्रकाश पारखी, सांस्कृतिक कार्यसंचनालय पुणे कार्यक्रम प्रमुख भरत लांघी यांच्या उपस्थित करण्यात आले. 

शुक्रवार (ता. १९) पर्यंत चालणाऱ्या या प्राथमिक फेरीत दररोज सात एकांकिका सादर केल्या जात आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत खुल्या विषयावर एकांकिका या बालकलाकारांकडून सादर केल्या जातात. डॉक्टर सुरेश पुरी, रमेश भिसिकर व सारिका पेंडसे परिक्षक म्हणून काम पहात आहेत. 

या स्पर्धेचे समन्वयक राहुल लामखडे म्हणाले, "या बालकलाकारांना रंगमंचावर अभिनय करत असताना त्यांच्यातील धाडस व व्यक्तिमत्त्व विकसित होते. तसेच प्रेक्षागृहाकडेही लोकांचा कल झुकून सामाजिक सांस्कृतिक उंचीही यातून वाढते, हाही एक मुख्य उद्देश यातून सफल होत आहे."टिव्ही आणि इंटरनेटच्या जमान्यात बालपण हरविलेल्या मुलांना या बालनाट्य स्पर्धेतून मुद्रा, वाचिक व कायीक अभिनयाची शिकवण पहायला मिळेल. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असल्याने शाळामधील विद्यार्थांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Marathi news pune news starts 15th maharashtra state childrens drama