पिंपरी: रुपीनगरमध्ये ज्येष्ठाची आत्महत्या 

संदीप घिसे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

प्रभाकर केशव पांचाळ (वय ६५, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रूपीनगर तळवडे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.२८) सकाळी उघडकीस आली.

प्रभाकर केशव पांचाळ (वय ६५, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रूपीनगर तळवडे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.पोलिस हवालदार अशोक पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर यांनी  राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निगडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक होळकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news Pune news suicide case in pimpri

टॅग्स