भर उन्हात प्रदूषणात वाढ

मीनाक्षी गुरव
सोमवार, 12 मार्च 2018

पुणे - भर उन्हात चटके खात पुण्यातल्या रस्त्यांवरून प्रवास करताना गेल्या आठ-दहा दिवसांपासून जरा जास्तच दमछाक होतेय? त्याचे कारण आहे प्रदूषणाची वाढलेली पातळी. दरवर्षी मार्चमध्ये हवेचा वेग वाढून प्रदूषण घटते; यंदा तसे झालेले नाही. उलट हवेतील धूलिकणांचे प्रमाण तब्बल ४० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या दोन वर्षांतील मार्चमध्ये न गाठलेली प्रदूषणाची पातळी यंदा पुण्याने गाठली आहे.

गेल्या तीन वर्षांत मार्चमध्ये पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक किंवा चांगली होती; परंतु या वर्षी मार्चमध्ये सलग एक आठवडा हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ आहे. या महिन्यात मुंबईकरांसाठी ‘मध्यम’ स्वरूपाची हवा सर्वसाधारण असली, तरी पुणेकरांसाठी ही निश्‍चितच काळजीची बाब आहे.
- डॉ. गुफरान बेग, प्रकल्प संचालक, सिस्टीम ऑफ एअर क्वॉलिटी ॲण्ड वेदर फोरकास्टिंग ॲण्ड रिसर्च (सफर)

थंडीत काय होते?
 हिवाळ्यात हवेचा वेग घटतो. 
 हवेतील प्रदूषके, धूलिकण जमिनीकडे खेचले जातात. 
 परिणामी थंडीत प्रदूषणाची पातळी वाढते. 

उन्हाळ्यात काय होते?
 थंड वाऱ्याचा प्रभाव कमी होतो. 
 मार्चमध्ये हवेचा वेग वाढतो. 
 परिणामी प्रदूषणाची पातळी कमी होत जाते.

मार्चमध्ये काय घडले?
 यंदा धूलिकण, सूक्ष्मकणांच्या प्रमाणात तब्बल ३० ते ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. 
 हवेतील नायट्रोजन ऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड यांच्या तुलनेत पीएम १० आणि पीएम २.५ चे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. 
 पीएम २.५चे प्रमाण डिसेंबरमध्ये नोंदविलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

प्रदूषणाची कारणे नोंदवू ...
फोटो, व्हिडिओ ‘सकाळ’ला ‘टॅग’ करा, ट्‌विटर, फेसबुक वर.
टॅग वापरा -  #रोखूप्रदूषण
email करा - webeditor@esakal.com

Web Title: marathi news pune news summer pollution