जुन्नरला तनिष्काच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

दत्ता म्हसकर
सोमवार, 5 मार्च 2018

महिला दिनानिमित्त तनिष्का व्यासपीठ जुन्नर व अॅकाॅर्ड संत ज्ञानेश्वर हाॅस्पीटल मोशी, यांच्या सहकार्याने महिलांसाठी  आम्ही घेतो काळजी तुमच्या आरोग्याची,. चला कॅन्सरवर मात करू या हा आरोग्यविषयक उपक्रम श्री तुळजा भवानी हाॅस्पीटल जुन्नर येथे आयोजित करण्यात आला.

जुन्नर : महिलांनी आपल्या अंतरबाह्य आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने कॅन्सर सारखा आजाराची तपासणी वेळोवेळी करून घ्यावी.या आजाराचे पहिल्या किंवा दुसऱ्या पायरीत निदान झाले तर तो बरा होऊ शकतो तसेच यासाठी खर्च देखील कमी येतो असे कॅन्सर तज्ञ डॉ.दीपा जोशी यांनी येथे सांगितले.

महिला दिनानिमित्त तनिष्का व्यासपीठ जुन्नर व अॅकाॅर्ड संत ज्ञानेश्वर हाॅस्पीटल मोशी, यांच्या सहकार्याने महिलांसाठी आम्ही घेतो काळजी तुमच्या आरोग्याची,. चला कॅन्सरवर मात करू या हा आरोग्यविषयक उपक्रम श्री तुळजा भवानी हाॅस्पीटल जुन्नर येथे आयोजित करण्यात आला. या शिबिरात 200 महिलांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे उदघाटन प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या  वंदना बहन, यांच्या शुभहस्ते व डाॅ. शितल तांबे, प्रसिद्ध आहार तज्ञ, डाॅ. शीतल तांबे, प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.दीपा जोशी, पत्रकार  दत्ता म्हसकर,  तसेच डाॅ. सुनील शेवाळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

प्रास्ताविक गटनेत्या उज्वला शेवाळे यांनी केले. डाॅ. दिपा जोशी यांनी  कॅन्सर विषयक व डाॅ. शितल तांबे यांनी अहार विषयक तसेच वंदना बहन यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचा असंख्य महिलांनी लाभ  घेतला. उपस्थित महिलांची बीपी, ब्लडशुगर, बीएमआय, पॅपस्मेयर या महत्त्वाच्या तपासण्या महिला दिनाची भेट म्हणून मोफत करण्यात आल्या . तनिष्का अंजली दिवेकर, उर्मिला थोरवे, माधुरी म्हसकर, सुनीता वामन, वैष्णवी चतुर, छाया वाळुंज, शितल खरपुडे, राधिका कोल्हे, मनीषा काळे, संगीता गोसावी, ज्योत्स्ना शिंदे, मनीषा तिवारी, सायली भांगरे यांनी संयोजन केले. ज्योती मेहेर यांनी स्वागत केले. सलमा सय्यद यांनी परिचय करुन दिला. सुत्रसंचलन पुनम तांबे यांनी केले. स्मिता हजारी यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi news Pune news Tanishka health camp