बारामती: साबळेवाडी येथे समाजमंदीराचे भूमिपूजन

संतोष आटोळे
बुधवार, 17 जानेवारी 2018

साबळेवाडी (ता.बारामती) येथे आमदार अजित पवार यांच्या फंडातुन वाघजाई मंदिर येथे तर खासदार   सुप्रियाताई सुळे यांच्या फंडातुन काळुबाई मंदिर येथे बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी पवार बोलत होते.

शिर्सुफळ : विविध विकासकामे होत असताना कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांनीच लक्ष देवुन चुकिची कामे होत असतील तर याबाबत तात्काळ सुचना करुन कामे दर्जेदार करुन घेणे गरजेचे आहे.यासाठी  जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सर्वोतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी दिली.

साबळेवाडी (ता.बारामती) येथे आमदार अजित पवार यांच्या फंडातुन वाघजाई मंदिर येथे तर खासदार   सुप्रियाताई सुळे यांच्या फंडातुन काळुबाई मंदिर येथे बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, बारामती दुध संघाचे संचालक व उपसरपंच संजय गाडेकर, सुभाष ढवाण,  अरविंद गुळुमकर, बबन साबळे, रमेश भापकर, नामदेव गाडेकर, मंगेश गोलांडे, नवनाथ गुळुमकर, विशाल गाडेकर, ग्रामसेवक अरुण जाधव यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, बारामती तालुक्यामध्ये खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत.यामध्ये गावातील स्थानिकांनीही पुढाकार घेत कामे दर्जेदार करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन  अधिकाधिक मदत करु अशी ग्वाही दिली   
 

Web Title: Marathi news Pune news temple in sablewadi