तंबाखूजन्य आणि अन्न पदार्थ एकाच दुकानातून विकण्यास बंदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पुणे : तंबाखू, सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ आणि चॉकलेट, बिस्कीटसारखे अन्न पदार्थ यापुढे एकाच दुकानातून विक्री करण्यास राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घातलेल्या बंदीबाबत पहिल्या टप्प्यात व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.

त्यानंतर त्यांना इशारा दिला जाणार असून, अंमलबजावणीच्या शेवटच्या टप्प्यात कारवाईचा बडगा उगारणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

शालेय मुलांना व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाकडे विचारणा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात विक्रेत्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरातील स्थानिक संघटनांचे प्रमुख, त्यांचे सदस्य यांना या आदेशाची माहिती दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

अंमलबजावणीच्या दुसऱ्या टप्प्यात अशा प्रकारे एकाच दुकानातून विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला इशारा दिला जाईल. त्याबद्दल करण्यात येणाऱ्या कारवाईची त्याला माहिती दिली जाईल. त्यानंतरही त्याने बदल न केल्यास अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या कायद्याच्या अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्त्वे लवकर प्रत्येक विभागाला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news tobacco ban in Maharashtra FDA