पीएमपीतून 158 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

सातत्याने गैरहजर राहत असल्याचा आरोप करत मुंढे यांनी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र कुठलीही पूर्वकल्पना न देता बदली वाहन चालकांवर कारवाई झाल्याने त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंतच्या हजेरीचा रेकॉर्ड पाहून 21 दिवसांपेक्षा कमी हजेरी असणाऱ्या कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे.

पुणे : कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले पीएमपीचे संचालक तुकाराम मुंढे यांनी पीएमपीच्या 158 कामगारांना अचानक बडतर्फ केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातत्याने गैरहजर राहत असल्याचा आरोप करत मुंढे यांनी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र कुठलीही पूर्वकल्पना न देता बदली वाहन चालकांवर कारवाई झाल्याने त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंतच्या हजेरीचा रेकॉर्ड पाहून 21 दिवसांपेक्षा कमी हजेरी असणाऱ्या कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे, आज बदली वाहकांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीही पीएमपीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. आता नव्याने कारवाई केल्याने ते चर्चेत आले आहेत. 

Web Title: Marathi news Pune news Tukaram Mundhe action on PMP employee