पुणे : उंड्री-पिसोळी रस्ता धोकादायक

समीर तांबोळी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

उंड्रीकडून पिसोळी कडे जाणार्‍या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण काही महिन्यापुर्वी झाले होते . परंतू काही दिवसातच रस्ता उखडला . रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा माल वापरल्यामुळे रस्त्याची ही अवस्था झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्याचे काम रखडल्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

पुणे : उंड्री कडून पिसोळी कडे जाणर्‍या रस्त्याचे दुरुस्तीकरण काही दिवसापासून रखडले आहे. रस्त्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. वाहने भरधाव येत असल्यामुळे येथे अपघाताची शक्यता वाढली आहे.रस्त्यावर असणारे पथदिवे बर्‍याचदा बंद असतात. तेथुन जाताना रात्री महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनुचित प्रकार घडण्यापूर्वी रस्ताचे काम पुर्ण करावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

उंड्रीकडून पिसोळी कडे जाणार्‍या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण काही महिन्यापुर्वी झाले होते . परंतू काही दिवसातच रस्ता उखडला . रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा माल वापरल्यामुळे रस्त्याची ही अवस्था झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्याचे काम रखडल्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

उंड्रीकडून पिसोळी कडे जाण्याकरिता (शॉर्ट्कट) जवळचा रस्ता असल्यामुळे, वाहनचालक, नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रात्रीच्या वेळी याठिकाणी बर्‍याचदा अंधार असतो. रस्त्याच्या कडेला असणार्‍या पटांगणाचा वापर मद्यपीकडून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अवैध धंदे तसेच मद्यपींमुळे नागारिक विशेषत: महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी महिला या रस्त्याचा वापर करण्यास घाबरतात.पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची त्यांची तक्रार आहे.

Web Title: Marathi news Pune news Undri road work