शेफ आपल्या कृतीमधून विविध भूमिका पार पाडतो : विष्णू मनोहर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पुणे : ''शेफ ज्या वेळी विचार करून कृती करतो; त्या वेळी तो विचारवंतांची भूमिका पार पाडतो. पदार्थामध्ये काय टाकले, की चव येईल याचा शोध तो वैज्ञानिकांच्या भूमिकेतून घेतो. तसेच विविध यंत्र हाताळताना तो टेक्‍निशियन असतो. कृतीमधून पदार्थ तयार झाला, की त्याचे सादरीकरण तो कलेने करतो. या सर्व अनुभवावर तो पुस्तक लिहीत असल्यामुळे तो लेखकाच्याही भूमिकेत असतो. त्यामुळे शेफ हा विचारवंत, लेखक, टेक्‍निशियन, वैज्ञानिक आणि कलाकार या पाच प्रकारचा धनी आहे,'' असे मत शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले. 

महिला दिनाच्या निमित्ताने 'सकाळ प्रकाशन'ने पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी घेतलेल्या मुलाखत ते बोलत होते. विष्णू मनोहर यांनी 'सकाळ प्रकाशन'साठी भारतीय करीचे रहस्य, बिर्याणी आणि पुलाव, खाऊचा डबा या तीन पुस्तकांचे लिखाण केले आहे.

बालपण, परिवार, पाककलेची आवड] त्यासाठी केलेला प्रवास, शिक्षण, वैयक्तिक गोष्टी, समाजकार्य आणि त्यांच्या नावाची नोंद 'गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे, याबाबत त्यांनी मुलाखतीत प्रकाश टाकला. 'डाएट' करा; पण त्याचा अतिरेक करू नका. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम व चांगला आहार घ्या, असा सल्लाही त्यांनी या वेळी उपस्थितांना दिला.

Web Title: marathi news pune news Vishnu Manohar Sakal Publications