प्रथमच अनोखा महिला दिन जुन्नर नगरपालिकेत साजरा

दत्ता म्हसकर
शनिवार, 10 मार्च 2018

जुन्नर शहरातील अनेक महिला ज्यांनी परिस्थिती वर मात करून प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपला संसार उभा केला व आपल्या मुलांना शिक्षण दिले.अशा खऱ्या कर्तृत्वान महिलांच्या सन्मान व सत्कार करण्यात आला.

जुन्नर : जुन्नर नगर पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने महिला दिन आनंददायी वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी स्त्री रोग तज्ञ डॉ.निलिमा जुन्नरकर , मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर , नगराध्यक्ष शाम पांडे  उपस्थित होते.

जुन्नर शहरातील अनेक महिला ज्यांनी परिस्थिती वर मात करून प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपला संसार उभा केला व आपल्या मुलांना शिक्षण दिले.अशा खऱ्या कर्तृत्वान महिलांच्या सन्मान व सत्कार करण्यात आला. प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू वाटप
पाच विजेत्यांना पैठणीचे वाटप जुन्नरमधील कन्यारत्न प्राप्त मातांना सन्मानपत्र व बेबीेकीट वाटप करण्यात आले.

जुन्नर मधील शाळा मध्ये सॅनिटरी नॅपकिन डीसपोजल मशिन बसवण्यात येणार आहे असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर  यांनी महिला हक्क व  अधिकार याविषयी माहिती दिली. डॉ. प्रमिला जुन्नरकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.  हाजरा इनामदार ,मोनाली म्हस्के,सना मन्सूरी यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विनी गवळी,समिना शेख,यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन कविता गुंजाळ व अंकिता गोसावी यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन सभापती कविता गुंजाळ, अंकिता गोसावी,सुवर्णा बनकर व सर्व महिला नगरसेविका यांनी केले.

Web Title: Marathi news Pune news womens day celebration in Junnar