विश्वविक्रमी ऐतिहासिक जिरेटोपाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

संदिप जगदाळे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

हडपसर (पुणे) : सातववाडी येथे कुसुमवंदन नाट्य संस्था व सहकार श्रमिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा "विश्वविक्रमी ऐतिहासिक जिरेटोप" बनवण्यात आला. साडेदहा फूट उंचीचा व तीस फूट परीघ आणि २७०९ मीटर कापडाने साकारलेला जिरेटोप बनविण्यासाठी तब्बत पाच तास लागले. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये याची नोंद झाली आहे. हा भव्य जिरेटोप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवजयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे प्रतिनिधी पवन साळंकी, महाराष्ट्रचे प्रतिनिधी दिनेश दैठणकर, डॉ. अमित आपटे, महेश गुलाब, संतोष राऊत या टीमने जिरेटोप मोजमापाचे काम पाहिले व त्याची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये नोंद करून याबाबतचे प्रमाणपत्र प्रदान केले. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड साठी या जिरोटोपाचे नॅामिनेशन करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आमदार योगेश टिळेकर यांनी दिली. 

यावेळी जिरेटोप बांधणी कलाकार शैलेश यादव यांचे जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक आमदार योगेश टिळेकर, प्रमोद रणवरे व मनोहर देशमुख यांच्या पुढाकारातून हा जिरेटोप बनविण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक मारुती तुपे, उज्वला जंगले, वैशाली बनकर, योगेश ससाणे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, विकास रासकर, संदीप दळवी, डॉ.शंतनू जगदाळे उपस्थित होते. याप्रसंगी बालकलाकारांचे नाट्य, पोवाडे, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वाती जगदाळे व सिध्देश्र्वर झाडबुके यांनी केले.  

Web Title: Marathi news pune news world record of india biggest jiretop