पोलिसांमुळेच जनसामान्यांचे जीवन सुकर- पोलीस उपा. गणेश शिंदे

ज्ञानेश्वर भंडारे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

वाल्हेकरवाडी(पुणे) : जुन्या काळापासून पोलीस अस्तित्वात आहेत. कोणत्याही क्षेत्रात पोलिसांची कामगिरी ही महत्वाची असते, पोलिसांमुळेच सामान्यांचे जीवन सुखर होते असे प्रतिपादन पुणे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सकाळ यिन संवाद मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. सकाळ यिन व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे राजेश्री शाहू इंजिनिअरिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के जैन, संचालक प्रा. रवी सावंत,डॉ. अजय पायथाने,डॉ अमेय चौधरी, सकाळ यिन शहर समन्वयक स्नेहल खानोलकर आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना शिंदे म्हणाले की, आयुष्यात चढउतार येत असतात त्यांना समोरे जा, लोकांच्या फायद्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन पोलीस हा राबत असतो, आव्हाने पेलायची असतील तर पोलीस मध्ये या. तुम्ही काम करत असतांना समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करा, सकारात्मक दृष्टीने पाऊल उचला. समयसुचकता व वेळेचे नियोजन हे आयुष्यात महत्वाचे आहे. भविष्यातील चांगले लोक हे आजच्या तरूणांमधून तयार होत असतात त्यामुळे चांगले बनण्याचा प्रयत्न करा.

आज समाजातील अत्याचार, हिंसा, बलात्कार या गोष्टी थांबायचा असतील तर स्वतः मधील सज्जन नागरिक जागरूक असणे महत्त्वाचे आहे. आज समाजात दैनंदिन गुन्ह्यापेक्षा सोशल मिडियाच्या गुन्ह्याची संख्या जास्त आहे. आजची महिला सक्षम आहे त्या क्षमतेच्या तिने संकट काळी वापर केला पाहिजे. आजच्या तंत्रज्ञान युगातील तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुन्हाच छडा लावता येतो. यावेळी विद्यार्थ्यांसमोर आपल्या नोकरीच्या वेळी आयुष्यातील आलेले क्षण त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित कदम यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य आर. के जैन यांनी केले.
 
Web Title: Marathi news pune news yin police