पवनामाई जलपर्णीमुक्त हे पिंपरी-चिंचवडकरांचे यश- अंजली भागवत

ज्ञानेश्वर भंडारे
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) - हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने अच्छादलेली पाहण्याची सवय असणा-या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रुप पहायला मिळाले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या पवनामाई उगम ते संगम नदी स्वच्छता अभियानामुळे  पवना नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र नागरिकांना पहायला मिळत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय खेळाडू व पिंपरी चिंचवड शहराच्या दूत अंजली भागवत यांनी केले. 

वाल्हेकरवाडी (पुणे) - हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने अच्छादलेली पाहण्याची सवय असणा-या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रुप पहायला मिळाले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या पवनामाई उगम ते संगम नदी स्वच्छता अभियानामुळे  पवना नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र नागरिकांना पहायला मिळत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय खेळाडू व पिंपरी चिंचवड शहराच्या दूत अंजली भागवत यांनी केले. 

'यात मी सहभाग नोंदवला हा माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेतच त्याचबरोबर मी माझे योगदान पण देणार आहे. जर हे असेच सर्वजण मिळून काम करत राहिले तर पिंपरी चिंचवड शहर हे नक्कीच भारतात अव्वल येईल,' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, देश का सच्चा हिरो चंद्रकांत कुलकर्णी, मनपा सहायक आयुक्त दिलीप गावडे, संदीप खोत, नगरसेविका करुणा चिंचवडे, अमित गोरखे, शेखर चिंचवडे,हेमंत गवंडे, सोमनाथ म्हसगुडे, अनिल नेवाले आदी उपस्थित होते.

रावेत घाटावर आज (रविवारी) सकाळी नऊ ते बारा या वेळेत पवना स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा अभियानाचा 92 वा दिवस होता. यावेळी 5 ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. आज अखेर 500 च्या वर ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, पीसीसीएफ, लेवा पाटीदार समाजाच्या महिला, रानजाई प्रकल्प,सावरकर मित्र मंडळ आजच्या उपक्रमात सामील झाले तसेच रोटरीचे सर्व सदस्य सामिल झाले होते. अभियानाच्या शेवटाकडे जाताना जास्तीत जास्त लोकांनी यांच्यामध्ये सहभागी व्हावं. नदी स्वच्छतेच काम केवळ रविवारी नाही तर दररोज काही कामगार जलपर्णी काढण्याचे काम करत आहेत. तर दर रविवारी आवर्जून आम्ही लोकही नदी काठावर जमतात. 

मुळा मुठा नदी सांगवी येथे ही जलपर्णीने पूर्ण भरलेली आहे. ही सत्य परिस्थिती आहे, परंतु पिंपरी पासून दापोडीपर्यंत पवना नदी पूर्णपणे जलपर्णी मुक्त आहे. आम्ही गेली 92 दिवस रोज करत असलेल्या कामाची ही खरी पावती आहे, असे समाधान संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब वाल्हेकरवाडी रो. प्रदीप वाल्हेकर यांनी व नदीवर प्रत्यक्ष काम करणारे सोमनाथ मुसुडगे यांनी व्यक्त केले. तर हा परिणामकारक वाल्हेकरवाडी पॅटर्न प्रशासनाने लवकरात लवकर अंमलात आणावा, अशी अपेक्षा वाल्हेकर यांनी व्यक्त केली.

 

Web Title: marathi news pune pimpri chinchwad anjali bhagwat