आम्ही ढेकूण मारायलाच आलोय! - राज्यमंत्री रवींद्र वायकर

marathi news pune problems student hostel state minister ravindra vaykar
marathi news pune problems student hostel state minister ravindra vaykar

पुणे - 'रूम मध्ये खूप ढेकणं झालीत ना? अरे मग सांगायचं तसं... आम्ही ढेकणं मारायलाच आलोय...' हा संवाद आहे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमधला! वायकर यांनी बुधवारी विद्यापीठातील वसतिगृह आणि अन्य विभागांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर 'ऑन-दि-स्पॉट' उपाय सुचवले. वसतिगृहात प्रवेश करताच 'पॅरासाईट' आहेत का या प्रश्‍नापासून सुरू झालेल्या विद्यार्थी-मंत्री संवादाचा अखेर 'विद्यार्थ्यांच्या समस्या तुम्हाला आता कळल्या ना? त्यासाठी मला मुंबईवरून यावं लागले' अशा शब्दात अधिकाऱ्यांच्या 'झापाझापी'त झाला. अखेर चांगले काम करण्याच्या आणि पुढच्या आठवड्यात 'रिपोर्ट' सादर करण्याच्या सूचना देत मंत्रिमहोदय पुढच्या कार्यक्रमाला निघाले. 

नियोजित दौरा; तरीही अस्वच्छता 
रवींद्र वायकर यांचा हा नियोजित दौरा असला तरीही वसतिगृहात अस्वच्छता असल्याचे पाहायला मिळाले. सकाळी गरम पाणी मिळत नाही, काही ठिकाणी वीज प्रवाह यंत्रणा सदोष असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न, खोलीतले पंखे धुळीने माखलेले, वसतिगृहाच्या आवारात फिरणारी कुत्री अशी परिस्थिती बुधवारी सकाळी दिसली. पाणी शुद्धीकरणाचे यंत्र प्रत्येक मजल्यावर असावे अशी मागणी या वेळी विद्यार्थ्यांनी केली. आमदार मेधा कुलकर्णी या त्यांच्याबरोबर होत्या. वसतिगृहातील खोल्यांची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याच्या मुद्‌द्‌यावरून वायकर आणि कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. 

पदाधिकाऱ्यांनी देखरेख ठेवावी 
वसतिगृहात फेरफटका मारताना रवींद्र वायकर यांनी काही मुलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्याकडील चांगला पेनही त्यांनी एका विद्यार्थ्याला दिला. चांगला अभ्यास करण्यासाठी रूममध्ये प्रसन्न वातावरण पाहिजे, कपडे नीट ठेवले पाहिजे, धूळ साफ केली पाहिजे अशा सूचना विद्यार्थ्यांना केल्या. विद्यार्थ्यांनी खोल्यांमध्ये स्वच्छता न राखल्यास वसतिगृहाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर देखरेख ठेवावी असेही त्यांनी बजावले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com