"शिकाऊ परवान्यासाठी पुन्हा परीक्षेची सक्ती करू नये' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे  - ""शिकाऊ वाहन परवान्यासाठी एकदा परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा तीच परीक्षा देण्याची सक्ती प्रादेशिक परिवहन विभागाने करू नये. मोटारवाहन कायद्यातील तरतुदीनुसार अशा उमेदवारांना पुनर्परीक्षेतून वगळता येऊ शकते. कायद्यातील या तरतुदीचे पालन करून पुण्यातील हजारो आणि राज्यातील लाखो नागरिकांना याचा लाभ द्यावा,'' अशी मागणी "महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन'चे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केली आहे. 

वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. "मोटारवाहन कायदा 1988'च्या कलम "11 क' मध्ये अशी तरतूद आहे की एकदा "प्रिलिमिनरी टेस्ट' दिल्यानंतर व त्याची नोंद "आरटीओ'कडे उपलब्ध असल्यास कोणत्याही उमेदवारांना पुन्हा तीच चाचणी देण्याची गरज पडणार नाही. "सारथी 1.0' यंत्रणा सुरू झाली तेव्हा या तरतुदीचा समावेश करण्यात आला होता. "सारथी 4.0' सुरू झाल्यापासून मात्र आरटीओ याचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. नवीन यंत्रणेमध्ये नोंद असलेल्यांनाच फक्त या तरतुदीचा लाभ मिळेल व त्यापूर्वीच्या उमेदवारांना मिळणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. म्हणजे लाखो नागरिकांना या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मोटारवाहन कायद्यातील तरतुदीचे पालन न करून आरटीओ विभागच कायद्याचे उल्लंघन करत आहे, असे घाटोळे यांनी सांगितले. 

""आरटीओ विभाग तसेच राज्याच्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी त्याची योग्य दखल घेऊन नागरिकांना सहकार्य करावे,'' अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

Web Title: marathi news pune rto