खेड-शिवापूर - केमिकल नेणाऱ्या ट्रकने घेतला पेट 

महेंद्र शिंदे 
मंगळवार, 20 मार्च 2018

खेड-शिवापूर - पुणे-सातारा महामार्गावर वरवे (ता.भोर) येथे मंगळवारी सकाळी एक केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकने पेट घेतला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक पूर्णपणे जळून ख़ाक झाला. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. 

याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक केमिकलचे बॅरेल असलेला ट्रक साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा ट्रक वरवे (ता.भोर) गावच्या हद्दीत आला असताना ट्रक मधील केमिकलने पेट घेतला. चालकाने बाहेर उडी मारल्याने चालक बजावला. तर संपूर्ण ट्रकने पेट घेतला. पुण्याहून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पेटलेला ट्रक विझविण्यात यश आला.

यामुळे काही वेळ पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र राजगड आणि महामार्ग पोलिसांनी बाजूच्या मुख्य रस्त्याने वाहने सोडली. मात्र अजूनही दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा आहेत.

Web Title: marathi news pune truck accident