अल्पवयीन मुलांना दुचाकी दिल्यास पालकांवरच कारवाई

संतोष आटोळे
शनिवार, 17 मार्च 2018

शिर्सुफळ (पुणे) - अल्पवयीन मुलांना गाडी देणे हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल पालकांना शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. यामुळे याबाबत पालकांनीच योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच सुज्ञ दुचाकी वाहनचालकांनी स्वताच्या सुरक्षेसाठी प्रवासात हेल्मेट वापरण्याचे आवाहन पुणे सोलापुर महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एच.अभंग यांनी केले.

महामार्ग पोलिसांच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावरील दुचाकी चालकांमध्ये प्रबोधनाविषयी अभंग बोलत होते. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर  दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याप्रसंगी या मार्गावरील दुचाकी चालकांना वाहतुक नियमांबाबत माहिती देत त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यात येत आहे.

याबाबात अधिक माहिती देताना अभंग म्हणाले, ''दुचाकी वाहन चालकांच्या अपघातांची संख्या वाढत असताना त्यात जखमी आणि मृत्यूची संख्याही वाढत आहे. यामध्ये अल्पवयीन विना परवाना वाहनचालकांचे प्रमाण जास्त आहे. याबाबत पालकांनीच जागरुक राहणे आवश्यक आहे''. तसेच अपघात झाल्यावर दुचाकी स्वार जखमी होतो त्यासोबत अनेक वेळा हेल्मेट न घातल्याने त्याचा जीव जातो यामुळे वाहन चालकांनी स्वताच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
Web Title: marathi news pune under age biker parents