जलवाहिन्या बदलीने पाणीपुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

प्रभाग क्र ३१ मध्ये मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या बसविल्या असून त्याचे उदघाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले.

पुणे (वारजे माळवाडी) - कर्वेनगर-वारजे परिसरात काही भागात जल शुद्धीकरण केंद्र असून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. पूर्वीपेक्षा या भागात लोकसंख्या वाढली. पूर्वीची जलवाहिनी कमी पडू लागली. म्हणून प्रभाग क्र ३१ मध्ये मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या बसविल्या असून त्याचे उदघाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यासाठी नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या पुढाकार घेतला.

नगरसेविका दिपाली धुमाळ, बाबा धुमाळ, आेकांर चरिटेबल ट्रस्टचे स्वप्निल देवराम दुधाने, संतोष बराटे, चारुदत्त घाटगे, रजनी पांचगे, बाबा खान, निरंजन नरसिह रानडे, महादेव मारुती आगवणे, दिलीप विश्वनाथ पाटील
चंद्रकांत निवृती खेरे, नवीन राजाराम नगरक़र, दत्तात्रय रामचंद्र पराड़कर, किशोर शेडगे, शिवाजी भोईटे, नंदिनी पानेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. भारत कॉलनी, शाहू कॉलनी १ ते ११, श्रीधर, विदिशा, विशाखा सोसायटी, वेदांत नगरी, कुलश्री- यशश्री कॉलनी, ओंकार कॉलनी, राजाराम पुलाजवळील सर्व परिसरात १४ इंची पाण्याची वहिनी बसविली जाणार आहे. 
या पाण्याच्या लाईन मुळे पुढील परिसराची समस्या कायम स्वरुपी सुटणार आहे. इंगळे नगर, दत्तादिगंबर कॉलनी, ब्रह्मचैतन्य, नवचैतन्य सोसायटी, तपोधाम, आनंद- एकता- अक्षय कॉलनी, वारजे हायवे परिसर १६ ते १० इंची पाण्याची वाहिनी बसविली जाईल.

जास्त दाबाने मिळणार पाणी 
पूर्वीच्या जलवाहिन्या छोट्या असल्याने कमी दाबाने पाणी मिळत होते. आता नवीन मोठ्या जलवाहिन्या असल्याने या भागाला पूर्वी पेक्षा जास्तीचा पाणी पुरवठा होईल. असे लक्ष्मी दुधाने यांनी सांगितले. 

Web Title: marathi news pune water supplier change vandana chavhan