पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

टाकवे बुद्रुक - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात ज्योत्स्ना करंजकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे), अमन सिंग (विश्वकर्मा इंग्लिश विद्यालय पुणे), तर आदिवासी उच्च प्राथमिक गटात कल्याणी शिंदे (आदर्श विद्यालय आंबोली), आदिवासी माध्यमिक गटात वैष्णवी मेदगे (सरस्वती विद्यालय औदर) या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांना प्रथम क्रमांक मिळाले. आंबी येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस् मध्ये आयोजित करण्यात आले होते.

टाकवे बुद्रुक - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात ज्योत्स्ना करंजकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे), अमन सिंग (विश्वकर्मा इंग्लिश विद्यालय पुणे), तर आदिवासी उच्च प्राथमिक गटात कल्याणी शिंदे (आदर्श विद्यालय आंबोली), आदिवासी माध्यमिक गटात वैष्णवी मेदगे (सरस्वती विद्यालय औदर) या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांना प्रथम क्रमांक मिळाले. आंबी येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस् मध्ये आयोजित करण्यात आले होते.

प्रदर्शनाची सांगता व पारितोषिक वितरण संरक्षण क्षेत्रातील जेष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर यांचे हस्ते झाले. सभापती गुलाबराव म्हाळसकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपसभापती शांताराम कदम, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, उपशिणाधिकारी बाळासाहेब राक्षे, टेक्निकल कॅम्पस् चे प्राचार्य मिलिंद कुलकर्णी व मावळ तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड आदी उपस्थितीत होते. वैज्ञानिक डॉ. नगरकर म्हणाले, 'विज्ञानानेच मानवी जीवन सुसह्य झाले आहे. लहान सहान घटनांचा ही वैज्ञानिक द्दष्टीकोनातून विचार करावा, तो विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच संशोधन प्रवृती निर्माण होऊन नवनव्या शोधांचा जन्म होईल. त्यासाठी विज्ञान प्रदर्शने, विज्ञान मेळावे, विज्ञान संम्मेलने प्रेरणादायी ठरत आहेत.' सभापती म्हाळसकर म्हणाले, 'प्रत्येकाचे ठायी वैज्ञानिक द्दष्टीकोन निर्माण झाला तर सामाजिक अधोगतीस सहाय्य ठरणाऱ्या अंधश्रद्धा संपुष्टात येतील.' 

राजेश गायकवाड म्हणाले, 'दृष्टी नव्हे तर दृष्टीकोन बदला म्हणजे पर्यावरणाविषयी आत्मियता वाटेल असे मत व्यक्त केले. यावेळी विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हा प्रदर्शनात एकूण १८२ प्रकल्प सादर झाले. त्यापैकी १३ प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी होतील.' प्रदर्शनाच्या ३ दिवसात सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी व ३ हजार पालक-ग्रामस्थांनी भेटी दिल्या. सूत्रसंचालन सुनीता कुलकर्णी व राजेंद्र दिवेकर यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत शिक्षणाधिकारी डॉ. मोरे यांनी केले. आभार उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी मानले. विद्यार्थी गट निहाय निकाल पुढीलप्रमाणे उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी) ज्योत्स्ना करंजकर (जि. प. शाळा निगडे), अर्पिता केळकर (हुजूरपागा पुणे), संदीप दळवी (शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर), माध्य. उच्च माध्य. गट (९ वी ते १२ वी) अमन सिंग (विश्वकर्मा विद्यालय पुणे), प्रसाद सुर्वे (लिंगनाथ विद्यालय भोंगवली),जेवदामी अली. (सरदार दस्तूर हायस्कूल पुणे), आदिवासी उच्च प्राथ. गट (६ वी ते ८ वी) कल्याणी शिंदे (आदर्श विद्यालय आंबोली), आदिवासी माध्य. व उच्च माध्य. (९ वी ते १२ वी) वैष्णवी मेदगे (सरस्वती विद्यालय औदर, शिक्षक गट निकाल प्राथमिक शिक्षक (शैक्षणिक साहित्यगट) एच. पी शेनाँय (म. गांधी विद्यालय पुणे), चांगुणा सोनवणे (जि. प. शाळा म्हाळूंगे इंगळे), माध्यमिक व उच्च माध्यमिक गट आर. एम. चौधरी (न्यू. इं. स्कूल खामगाव) प्राथमिक शिक्षक (लोकसंख्या शिक्षण) अरविंद मोढवे (जि. प. शाळा म्हाळूंगे पडवळ), संध्या राऊत (जि. प. शाळा उतरोळी), आर. जी. गुळदे (जि. प. शाळा माळेगाव खुर्द), माध्य. व उच्च माध्य. शिक्षक (लोकसंख्या शिक्षण), ए. के. देशमाने (काशिनाथ खुटवड विद्यालय हातवे), शिल्पा घोगरे (सह्याद्री स्कूल पुणे), अनिल स्काँट सरदार दस्तूर हायस्कूल ई पुणे परिचर सहाय्यक अर्जुन रामचंद्र (वाघेश्वरी विद्यालय निरा), चंद्रकांत घाडगे यांनी विजेतेपद पटकाविले. 

Web Title: marathi news pune zp district science exhibition