पुण्यातील सांगवीत बस चढली दुभाजकावर.. 

रमेश मोरे        
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील सांगवी फाटा महात्मा ज्योतिबा फुले पुला शेजारील रस्त्यावरून मनपाकडे जाणारी आकुर्डी स्टेशन-मनपा बस क्र. (एमएच-14 9984) या पुण्याकडे जाणाऱ्या स्टेअरिंग रॉडचा बोल्ट वळणावरच अचानक तुटल्यामुळे अचानक ब्रेक लागले नाहीत, म्हणून चालक पांडुरंग सांगळे यांनी प्रसंगावधान राखून बस दुभाजकावर चढवली. 

सकाळची वेळ असल्यामुळे बसमध्ये जवळपास 70-80 प्रवासी होते. थोडे मागे किंवा पुढे सदर प्रकार घडला असता तर मोठा अपघात घडला असता. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला. यामुळे पुन्हा जुन्या बसबद्दल नागरीकांमधून भिती व्यक्त केली जात आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. 25 ते 30 फुटांवरच सांगवी फाटा येथे काळेवाडी कडून मोठ्या प्रमाणात वाहने असतात. पुलाखालील मोकळ्या जागेत दुभाजकावर बस घालताना काही सेकंदातच घेतलेल्या निर्णयात चालकाने कसेबसे ब्रेक दाबल्यामुळे वाहक भागवत खेडकर हे चालकांच्या शेजारील इंजिन लगतच्या जागेत पडल्यामुळे त्यांच्या हाताला मुक्का मार लागला आहे.

सकाळी सव्वा सातच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर तब्बल तीन तासांनी साडेदहाच्या दरम्यान बस तात्पुरती दुरुस्त करून डेपोकडे रवाना झाली. यामुळे बराच वेळ या ठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरु होती. "शिस्तीच्या नावाखाली कामगारांवर कडक कारवाई करणारे पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक तुकाराम मुंढे साहेब अशा कर्तव्यदक्ष चालकाचा सत्कार करणार का?" असा सवाल सामाजिक कार्यकर्ते युवराजसिंह गायकवाड यांनी केला आहे.    

Web Title: Marathi news sangavi news bus getting on speed breaker