गरीब रुग्णांची आर्थिक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

पुणे - ससून रुग्णालयात केसपेपरपासून एमआरआयपर्यंत सर्वच सेवांमध्ये शुल्कवाढ करण्याबरोबरच गरोदर महिलांकडूनही सोनोग्राफीसाठी शुल्क घेण्याचा फतवा काढण्यात आल्याने गोरगरीब रुग्णांची आर्थिक कोंडी होत आहेत. विविध सेवांचे वाढविण्यात आलेले शुल्क त्वरित पूर्ववत करावे, अशी मागणी होत आहे.  

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत ससून रुग्णालय असल्यामुळे त्या ठिकाणी पुणे शहर व जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथून रुग्ण येत असतात. २० नोव्हेंबर २०१७ मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून सर्व शासकीय रुग्णालयांतील विविध सेवांचे नवीन शुल्क यादीसह जाहीर केले. त्यामध्ये केसपेपर,

 रक्‍तचाचणी, सोनोग्राफी, एक्‍स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, वैद्यकीय व अपंगत्व प्रमाणपत्रासह एकूण १ हजार ३१९ सेवांचा समावेश आहे. ही शुल्कवाढ ३० ते शंभर टक्के आहे. पूर्वी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मोफत दिले जात होते, त्यामध्ये नोकरीसाठी हवे असल्यास ५०० रुपये व अन्य कारणांसाठी असेल, तर ५० रुपये शुल्क ठेवले आहे.

या संदर्भात ‘राज्य सरकारच्या आदेशानुसार शुल्कवाढ केली असून, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून रुग्णालयातील पायाभूत सुविधेसह अन्य लोकोपयोगी सोई उभारण्यात येतील,’ असे ससून रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या आवारात शुल्कवाढीविरोधात विविध संघटनांच्या वतीने सह्यांची मोहीम व धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

गतवर्षी २० नोव्हेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांतील विविध सेवांचे शुल्क वाढविण्यात आले आहे. दर दहा वर्षांनी ही वाढ केली जाते. यामधून जे आर्थिक उत्पन्न मिळेल त्यातून रुग्णालयातील पायाभूत सुविधेसह अन्य लोकोपयोगी सुविधा उभारल्या जातील.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय 

रुग्ण व नागरिकांच्या प्रतिक्रिया ः 
ही शुल्कवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. पूर्वी केसपेपर असो वा रक्त तपासणी त्यासाठी शुल्क आकारले जात नव्हते. पण झालेली शुल्कवाढ गरजू व्यक्तींसाठी त्रासदायक ठरेल. सरकारी आरोग्यसेवांचा लाभ घेणे हा सर्वसामान्यांचा हक्क आहे. त्यातही अशी शुल्कवाढ झाली तर गरिबांनी जायचे कुठे हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे शुल्कवाढीला आम्हा ज्येष्ठ नागरिकांचाही विरोध आहे. आधीच आरोग्यसेवांचे तीनतेरा वाजले असताना अशा प्रकारची शुल्कवाढ सर्वसामान्यांवर अन्याय आहे. ही शुल्कवाढ त्वरित मागे घ्यावी.
- राजा नेर्लेकर, ज्येष्ठ नागरिक

ससून रुग्णालयात मध्यंतरी माझ्या मुलगा ॲडमिट होता. तेव्हा आम्हाला अधिक शुल्क भरावे लागले नाही. अवघ्या पाचशे ते हजार रुपयांमध्ये त्याला आरोग्य सुविधेचा लाभ घेता आला. पण रुग्णालयाने आता केलेली शुल्कवाढ गरजू व्यक्तींना परवडणारी नाहीच. केसपेपर, एक्‍स रे, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या गोष्टींसाठी शुल्कवाढ करणे गरजेचे नव्हते. खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल आरोग्य सुविधांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. 
- सुभाष चव्हाण, ज्येष्ठ नागरिक 
 
सरकारी रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांचा लाभ प्रामुख्याने सर्वसामान्य घेतात. म्हणून पूर्वी मोफत असलेल्या आरोग्य सुविधांवर शुल्कवाढ करणे गरजेचे नव्हते. त्यामुळेच सर्वसामान्यांचा सरकारी रुग्णालयांवरचा विश्‍वास उडाला आहे. तेही खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याला प्राधान्य देत आहेत. आधीच सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांची बोंब आहे. त्यात अशी शुल्कवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरील आहे. लोकांचे हित लक्षात घेऊ हा निर्णय मागे घ्यावा.
- नीलेश देसाई, नोकरदार

झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे हातावर पोट असते, त्यामुळे नोकरीवर रजा घेऊन एक दिवसाचा पगार बुडवून ससूनला यावे लागते. पूर्वी पाच ते दहा रुपये केसपेपरला घेत होते. परंतु एकदम वीस रुपये केले त्याची काही हरकत नाही. पण एक्‍स रे, सोनोग्राफी आणि एमआरआयसारख्या सेवा महाग केल्या आहेत. त्या गरिबांना परवडणाऱ्या नाहीत, त्यामध्ये कपात केली जावी.
- मंदा गायकवाड, महिला रुग्ण

आर्थिक दुर्बल, गरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा दिली पाहिजे. परंतु विविध तपासण्या व उपचारांसाठी ३० ते १०० टक्‍क्‍यांपर्यंत शुल्कवाढ केली आहे. राज्य सरकारने गर्भवती महिलांना सोनोग्राफीसह अन्य आवश्‍यक चाचण्या मोफत द्याव्यात. रिक्त जागा भराव्यात. सार्वजनिक आरोग्य सेवा देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी. शुल्कवाढीविरोधातील आंदोलन व्यापक करणार आहोत.
- डॉ. लता शेप, अध्यक्ष, जन आरोग्य मंच

ससून रुग्णालयातील शुल्कवाढीची तुलनात्मक आकडेवारी 
    सेवा    पूर्वीचे शुल्क    नवीन शुल्क
    केसपेपर (बाह्यरुग्ण विभाग - ओपीडी)    १० रु.    २० रु.
    आंतररुग्ण प्रतिदिन केसपेपर    २० रु.    ३० रु.
    हिमोग्राम (सर्वसामान्य रक्तचाचणी)    २० रु.     ६० रु.
    वैद्यकीय प्रमाणपत्र    १५० रु.    २५० रु.
    अपंगत्व प्रमाणपत्र    निःशुल्क    ५०० रु.
    सोनोग्राफी    १०० रु.    १२० रु.
    एक्‍स-रे    ७५ रु.    १२५ रु.
    सीटी स्कॅन    ३०० रु.    ३५० रु.
    एमआरआय    १८०० रु.    २ ते अडीच हजार 

गतवर्षी २० नोव्हेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांतील विविध सेवांचे शुल्क वाढविण्यात आले आहे. दर दहा वर्षांनी ही वाढ केली जाते. यामधून जे आर्थिक उत्पन्न मिळेल त्यातून रुग्णालयातील पायाभूत सुविधेसह अन्य लोकोपयोगी सुविधा उभारल्या जातील.
- डॉ. अजय चंदनवाले,  अधिष्ठाता, ससून रुग्णालय 

ससून रुग्णालयात मध्यंतरी माझ्या मुलगा ॲडमिट होता. तेव्हा आम्हाला अधिक शुल्क भरावे लागले नाही. अवघ्या पाचशे ते हजार रुपयांमध्ये त्याला आरोग्य सुविधेचा लाभ घेता आला. पण रुग्णालयाने आता केलेली शुल्कवाढ गरजू व्यक्तींना परवडणारी नाहीच. केसपेपर, एक्‍स रे, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या गोष्टींसाठी शुल्कवाढ करणे गरजेचे नव्हते. खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल आरोग्य सुविधांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. 
- सुभाष चव्हाण, ज्येष्ठ नागरिक 

Web Title: marathi news sasoon hospital pune Poor patient