सासवड पोलीस ठाणे महिलादिनी महिलांच्या हाती

श्रीकृष्ण नेवसे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

सासवड (पुणे) : येथील पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले सासवड पोलीस ठाणे `महिलादिना`निमित्ताने पूर्णपणे महत्वाच्या जबाबदाऱया देत महिला पोलीसांच्या हाती सोपविले होते. या जबाबदाऱया त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या. ठाणे अंमलदार महिला, माहिती व जनसंपर्क अधिकारी महिला, वायरलेस, काॅम्युटर आॅपरेटर व सहाय्यकही महिलाच होती. 

काल रात्रपाळी करुन आज सकाळी उतरलेल्या महिला पोलीस नाईक पल्लवी राळेभात, सीसीटीएनएस विभागाच्या पोलीस शिपाई वैशाली राखपसरे यांच्यानंतर सीसीटीएनएसची जबाबदारी महिला पोलीस नाईक वर्षा भोसले यांनी घेतली. तर वायरलेसला महिला पोलीस नाईक नीता दोरके आल्या. संगिता राणे - करचे या पोलीस ठाण्याच्या महिला कारकून व महिला हवालदार आहेत. त्यांनी ती जबाबदारी पार पाडतानाच आज पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पवार यांची माहिती व जनसंपर्क अधिकाऱयाचीही जागा घेतली. त्यांचा सन 2011 पासूनचा ठाणे अंमलदार होण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सीमा घुले या नोकरी कालावधीत आज पहिल्यांदाच ठाणे अंमलदार झाल्या होत्या. त्यांना मदतनीस म्हणून पोलीस नाईक रुपाली जमदाडे मदत करीत होत्या.

महिला पोलीस कर्मचाऱयांनी आज महिलादिनानिमित्त पोलीस ठाणे चालविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे दुपारपर्यंत एकही फिर्याद किंवा तक्रार आली नाही. दुपारनंतर ऊसजळीताचा एक विषय आला, त्याची उत्तमपणे नोंद या महिला पोलीस कर्मचाऱयांनी घेतली. यानिमित्ताने पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी महिला पोलीस कर्मचारी यांना चांगली संधी दिली. त्यातून आम्ही महिला सक्षमपणे कामास समर्थ आहोत, हेच सिध्द होते., असे महिला ठाणे अंमलदार सीमा घुले, संगिता राणे यांनी प्रतिक्रीयेत सांगितले.  

Web Title: Marathi news saswad news womens days police station hands in women