Supreme Court
esakal
पुणे
Supreme Court: एक याचिका देशातील प्रत्येकासाठी निर्णायक… आगीत मुलगी गमावलेल्या वडिलांची लढाई, सरकारनं नाही पण बापानं करुन दाखवलं
Nationwide Fire Safety and Disaster Management Reforms : आगीत आपली मुलगी गमावलेल्या वडिलांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आणि अग्निशमन सेवांच्या कमतरता दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली
आगीत प्रिय मुलीला गमावलेल्या वडिलांनी देशातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आली असून, त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि संबंधित यंत्रणांना नोटीस बजावली.

