"रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्‍ट'विषयी खास एकदिवसीय कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पुणे - रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्‍ट (रेरा) एक मेपासून लागू झाला असून, याबाबत यापूर्वी झालेल्या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा ही कार्यशाळा 22 जून रोजी आयोजिली आहे.

पुणे - रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्‍ट (रेरा) एक मेपासून लागू झाला असून, याबाबत यापूर्वी झालेल्या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा ही कार्यशाळा 22 जून रोजी आयोजिली आहे.

नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी हा कायदा फायद्याचा असून, त्याअंतर्गत प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती तसेच जागा, सरकारी आदेश, किंमत, बिल्डिंगचा लेआउट आदी माहिती सांगणे आवश्‍यक आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही बिल्डर कॉम्प्युटर लेआउटच्या आधारावर सुपर बिल्डअप एरिया दाखवत असत; पण यापुढे नव्या नियमानुसार, ग्राहकांना कार्पेट एरिया सांगणेही आवश्‍यक असेल. एखाद्या प्रकल्पाला उशीर झाल्यास त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसत असे. बिल्डरवर काहीही परिणाम होत नसे; पण रेरा कायद्यानुसार प्रकल्पाला उशीर झाला, तर बिल्डरला हप्त्याच्या व्याजाची काही रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल.

रिअल इस्टेट ब्रोकर्स, बांधकाम व्यावसायिक, तसेच या कायद्याविषयी माहिती हवी असणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयोगी आहे. प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये शुल्क आहे.

"वर्ड प्रेसद्वारे करा स्वत: वेब डिझायनिंग'
पुणे : उत्तम वेबसाइट डिझायनिंग नियोजन कसे करावे, यासाठी आवश्‍यक वर्ड प्रेसची ओळख व कॉन्फिगरेशन, त्याचे सेटिंग, इंटरफेस, वॅम्पसर्व्हर इन्स्टॉलेशन, प्लग-इन, न्यू पेज स्क्रीन ऍडिशन, वेब पेज, मेनू, कॉन्टॅक्‍ट व ऑनलाइन फॉर्म बनविणे, हायपरलिंक, इमेज स्लाइडर, गुगल मॅप, फोटो गॅलरी, सोशल मीडिया बटन्स, युजर आदींचा समावेश करणे, थिम्स अँड ऍपिअरन्स, विजेट्‌स अँड साइडबार, शॉर्टकोड, वर्ड प्रेस वेब सिक्‍युरिटी, बॅकिंग अप द वेबसाइट, मेकिंग द वेबसाइट लाइव्ह डेमो आदींविषयी लेखी व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे चारदिवसीय प्रशिक्षण 27 ते 30 जून रोजी आयोजिले आहे. डिजिटल मार्केटर्स, वेब डिझायनर्स, उद्योजक, मार्केटिंग प्रोफेशनल्स, मार्केटिंगचे विद्यार्थी आणि ज्यांना वेबसाइट डिझायनिंगमध्ये करिअरची इच्छा आहे, ते यात सहभागी होऊ शकतात. संगणक ज्ञान आवश्‍यक. प्रतिव्यक्ती आठ हजार रुपये शुल्क आहे.

दोन्ही प्रशिक्षणासाठी संपर्क :
9130070132 आणि 8888839082

Web Title: marathi news training programme SILC training real estate web designing