उरुळी कांचनमध्ये तरूणीवर चाकूहल्ला

जनार्दन दांडगे
सोमवार, 22 जानेवारी 2018

उरुळी कांचन (पुणे) : मित्राबरोबर संपर्क जुळवून देण्यासाठी बहिणीला मोबाईल दिल्याच्या कारणावरून चिडलेल्या सौरभ कैलास चौधरी (रा. दत्तनगर, उरुळी कांचन, ता. हवेली) या भावाने बहिणीच्या मैत्रिणीवर चाकूने वार केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडली. याप्रकरणी जखमी तरुणीने लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या या तरुणीने मित्रासोबत संपर्क जुळवून देते यासाठी आपल्या बहिणीला मोबाईल दिल्याची गोष्ट सौरभला समजली. यावर सौरभने रविवारी (ता. 21) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलीला अडवून विचारपूस केली तसेच गळा दाबून सोबत आणलेल्या चाकूने मुलीच्या पोटात, हातावर व कमरेवर वार केले. मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news uruli kanchan news stabbing on girl