सहकार सुगंधचा 'प्रतिबिंब' पुरस्कार डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेला

जनार्दन दांडगे
सोमवार, 12 मार्च 2018

उरुळी कांचन (पुणे) : सहकार भारती व सहकार सुगंध आयोजित राज्यव्यापी वार्षिक (२०१६-१७) अहवाल स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र (पतसंस्था) विभागातून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेस 'प्रतिबिंब' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनतर्फे दिशादर्शक कामकाजाचा 'दिपस्तंभ' पुरस्कार मिळाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी दिली.

सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, राज्य सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर आनास्कर, राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी व मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच अविज पब्लिकेशन आणि गॅलक्सी ईन्मा यांच्या तर्फे पतसंस्थेला २०१७ मधील १०० कोटींच्या पुढील ठेवींच्या विभागातील 'बँको-पतसंस्था पुरस्कार मिळाला. या पुरस्कारचे वितरण आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या वतीने संचालक संजय कांचन व सहाय्यक मुख्य व्यवस्थापक अजय पवार यांनी पुरस्कार स्वीकारला.

यावेळी कांचन म्हणाले,"पतसंस्थेचे संपूर्ण पुणे जिल्ह्यात कार्यक्षेत्र असून एकूण आठ शाखामार्फत संस्थेचे काम सुरु आहे. संस्थेकडे ५ कोटी ३२ लाख रुपयांचे भागभांडवल, १५८ कोटी रुपयांच्या ठेवी, ११९ कोटी रुपयांचे कर्जवाटप व संस्थेने ४८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच संस्था नेहमी 'अ' वर्ग ऑडित मध्ये आहे. संस्थेच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे इत्यादी कार्यक्रम घेतले जातात."

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news uruli news pratibimb award sahakar sugandh