पुणे जिल्हातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी

राजकुमार थोरात
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

वालचंदनगर : पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागातील ७१८ रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हिवाळी अधिवेशामध्ये केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यामध्ये २०५८ पदे मंजूर आहेत. यातील १३४० पदावरती कर्मचारी कार्यरत असून ७१८ पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी (४४), महिला आरोग्य सेवक (३५४), महिला आरोग्य साहय्यक (१३), पुरुष आरोग्य सेवक (२६६), पुरुष आरोग्य साहय्यक (१८), औषध निर्माण अधिकारी (१५), आरोग्य पर्यवेक्षक (५), प्रयोगशाळज्ञ तंत्रज्ञ (३) यांचा समावेश आहे.

वालचंदनगर : पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागातील ७१८ रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हिवाळी अधिवेशामध्ये केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यामध्ये २०५८ पदे मंजूर आहेत. यातील १३४० पदावरती कर्मचारी कार्यरत असून ७१८ पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी (४४), महिला आरोग्य सेवक (३५४), महिला आरोग्य साहय्यक (१३), पुरुष आरोग्य सेवक (२६६), पुरुष आरोग्य साहय्यक (१८), औषध निर्माण अधिकारी (१५), आरोग्य पर्यवेक्षक (५), प्रयोगशाळज्ञ तंत्रज्ञ (३) यांचा समावेश आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य विभागाला सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यात पैसे खर्च करून उपचार घेण्याची वेळ येत असल्यामुळे आमदार भरणे यांनी तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी भरणे यांनी केली असून आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी अधिवेशनानंतर तातडीने पुणे जिल्हातील रिक्त पदे भरती प्रक्रिया सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. 

इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे पुणे जिल्हा परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करुन आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज इमारत बांधली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी भरतीसाठी पदे मंजूर नसल्याने आरोग्य केंद्राची इमारत धूळ खात पडून असून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्यकेंद्रातील पदांना मंजूरी देऊन तातडीने आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी भरणे यांनी हिवाळी अधिवेशामध्ये केली. 

 

Web Title: Marathi news vacancies fill in health department