पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले - एस.एम.देशमुख

Valchandnagar
Valchandnagar

वालचंदनगर : राज्यामध्ये पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच पत्रकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केली. जंक्शन (ता.इंदापूर) येथे वालचंदनगर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार व युवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अभिजित तांबिले, पंचायत समितीचे सदस्य सारिका लोंढे, सरपंच निर्मला चव्हाण उपस्थित होते. 

यावेळी देशमुख यांनी सांगितले की, देशामध्ये चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे. २०१७ मध्ये राज्यामध्ये सुमारे ८० पत्रकारांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर समाजामध्ये कुठेही मोर्चा आंदोलन होत नाहीत हे दुर्देवी आहे. पत्रकाराकडून समाजातील नागरिक अनेक अपेक्षा ठेवत असतात. मात्र हल्ला झाल्यानंतर त्यांच्या मदतीलाही येणे गरजेचे आहे. तसेच राज्यामध्ये पत्रकारवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. पत्रकारांच्या विरोधामध्ये तक्रारी अर्ज आल्यानंतर त्या अर्जाची विभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम सुरु असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी आमदार भरणे यांनी सांगितले की, तालुक्यातील पत्रकारांचा विमा उतरविला जाईल. मात्र यासाठी पत्रकारांनी लवकरात लवकर आवश्‍यक असणारी कागदपत्रे देण्याची गरज आहे. यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, पत्रकारांमुळे समाजातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे. 

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे सुनिल वाळुंज, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनिल लोणकर, उपाध्यक्ष एम.जी.शेलार, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमोल पाटील, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, राहुल जाधव, जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, उद्योजक राजूशेठ पालीवाल, अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील, वसंत पवार, ज्ञानदेव बोंद्रे, गजानन वाकसे, श्‍यामराव भोसले, युवराज म्हस्के, डॉ. जय देसाई, डॉ.एन.जी.रणवरे, रवींद्र रणवरे, वीरसिंह रणसिंग, शुभम निंबाळकर, अभिजित क्षीरसागर, सुमित पारखे, विनोद गांधी, योगेश डोंबाळे, संतोष भिसे, प्रदीप रकटे, सत्यशिल पाटील, शिवसेनेचे संजय काळे, योगेश कणसे, सुरेश कापडी, विजय शिंदे, दादासो काळे, तानाजी शिंदे, गुलाब म्हस्के, राहुल साबळे, विशाल साबळे, दत्तात्रेय गायकवाड, शिवाजी शिंदे, नेताजी लोंढे, महेश लोंढे, सूरज वनसाळे, शेखर काटे, कुमार शिंदे, मारुती नलवडे, सागर मिसाळ, अंबादास लांगडे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बॅंकींग क्षेत्रामध्ये तत्पर सेवा देणारे देना बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक महेशकुमार ननवरे यांचा व तालुक्यामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या अकरा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय थोरात, सूत्रसंचालन औदुंबर बुधावले व आभार प्रेमकुमार धर्माधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार राजकुमार थोरात, बाळासाहेब कवळे, गजानन टिंगरे, हरीदास वाघमोडे, संभाजी रणवरे यांनी प्रयत्न केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com