तंत्रशिक्षणाचे प्रशिक्षण काळाची गरज..

राजकुमार थोरात
शनिवार, 13 जानेवारी 2018

वालचंदनगर : देशामध्ये कुशल अभियंत्याची गरज असून तंत्रशिक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज झाली असल्याचे मत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपसचिव डॉ. एम.आर. चितलांगे यांनी व्यक्त केले. 

वालचंदनगर : देशामध्ये कुशल अभियंत्याची गरज असून तंत्रशिक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज झाली असल्याचे मत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपसचिव डॉ. एम.आर. चितलांगे यांनी व्यक्त केले. 

कळंब (ता.इंदापूर) येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व बाळासाहेब फडतरे पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हाचे माध्यमिक विभागाचे शिक्षणधिकारी गणपत मोरे, फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, पंचायत समिती सदस्या शैला फडतरे, सरपंच उज्वला फडतरे, रामचंद्र कदम, प्राचार्य के.बी.गवळी

 उपस्थित होते. यावेळी चितलांगे यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये डिजीटल इंडिया, स्मार्ट सिटी, मेट्रो रेल्वे व इतर विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. देशाच्या प्रगतीसाठी सर्व कामे कमीत-कमी वेळेमध्ये पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी कुशल अभियंत्याची गरज आहे. तसेच तंत्रशिक्षण घेणारा युवक स्वत:चा व्यवयास ही सहजपणे सुरु करतो शकतो. युवकांनी तंत्रशिक्षणामुळे उद्योजक बनण्याची संधी मिळू शकत असल्याने विद्यार्थ्यांनींनी दहावी-बारावी नंतर तंत्रशिक्षणाची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले. तंत्रशिक्षण मंडळ व बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकच्या वतीने पुणे जिल्हातील कळंब, गोतोंडी, भवानीनगर, बावडा, बारामती व सोलापूर जिल्हातील नातपुते येथे फिरते मेळावे घेवून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची माहिती देण्यात आली.

 

Web Title: Marathi news valchandnagar technical training importance